.container-v {
position: relative;
width: 100%;
overflow: hidden;
padding-top: 56.25%; /* 16:9 Aspect Ratio */
}
.responsive-iframe {
position: absolute;
top: 0;
left: 0;
bottom: 0;
right: 0;
width: 100%;
height: 100%;
border: none;
}
'प्रेरणा'....
गाथा - अनन्त्_यात्री
विडंबनाची 'प्रेरणा' फक्त शीर्षकावरून मिळाली आहे. संतश्रेष्ठ, क्षमाशील तुकाराम महाराजांचा, समस्त भक्तगणांचा व मिपा कविवर्यांचा क्षमाप्रार्थी आहे.
मिपावरील संतसाहित्याचा गाढा व्यासंग बघून भारावून गेलो. वाटले, आपणसुद्धा ही वाट चोखाळून बघावी. विसाव्याच्या क्षणी भंजाळलेल्या डोक्यात काही कवडसे पडतात का पाहावे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात,
मन, बहु चंचल चपळ।
जाता-येता न लगे वेळ।।
कबीरदासजी म्हणतात, 'मन पाण्यापेक्षा पातळ, वार्यापेक्षा वेगवान, लालची आणि आळशी'.
'पाणी ही तै पतला, धुवां ही तै झीण ।
पवनां बेगि उतावला, सो दोसत `कबीर’ कीन्ह॥'
कबीर यह मन लालची, समझै नहिं गंवार।
भजन करन को आलसी, खाने को तैयार।।
गाथा वाचताना अगदी बेतुक्याची अशीच आवस्था झाली. मन सारखे भरकटत होते आणि एक बेतुकी रचना मनात प्रकटली.
गाथ्याकूट....
अ. क्र. १
बेतुक्या, ठार वेडा, अविचारी |
बडबड फार करी, जनामाजी || १ ||
हा नोहे माझ्या बुद्धीचा प्रकार l
मांडला निरा शब्दांचा व्यापार || २ ||
लावी ट ला ट, ते माझे कवित्व l
शोधतो देवत्व काजव्यातळी || ३ ||
फुटले धुमारे, झाली उपरती l
मांडला प्रपंच सांजवेळी || ४ ||
आधी वंदू कमळापती l
तयाचिये कृपे चाले मती || ५ ||
मग वंदू लक्ष्मी आणि नारायण (मतदार) l
जे सत्ताप्राप्तीचे कारण || ६ ||
अंती वंदू भक्तांसी l
त्यांचेविना नाही गती....|| ७ ||
अ.क्र. २ ते २०२३
XXXXX.....
अ.क्र-2024
वेढा वेढा रे K-जरी |
मोर्चे (ED) लावा यमुनातिरी || १ ||
चला चला पंतजन |
बांधू लोकांशी संधान || २ ||
लुटा लुटा हस्तिनापूर |
चला घेरू या भगवंत || ३ ||
बेतुक्या म्हणे बाहेर काढा |
घोटाळ्यांचा वाचा पाढा || ४ ||
पेटवा C B I ची धुनी |
चेतवा S I T चा वन्ही || ५ ||
शब्दे करुनी तोडाफोडी |
K-जरी पायी घाला बेडी || ६ ||
हात धरुनिया कमळापती |
करू सकलांची प्रगती || ७ ||
(सबका साथ सबका विकास)
वेढा वेढा रे K-जरी......
- बेतुक्या
तळटीप-:
मूळ अभंग - 'वेढा वेढा रे पंढरी'. महाराज म्या पामराला नक्कीच क्षमा करतील.
कोणालाच दुखवण्याचा हेतू नाही, उलट चेहर्यावरील असंख्य स्नायूंना व्यायाम आणि सांसारिक कटकटींपासून क्षणभर दूर जाता यावे, हाच एकमेव उद्देश आणि गोड मानून घ्याल हीच अपेक्षा.
विश्वजीत बोरवणकर यांनी हा अभंग खूपच सुंदर गायला आहे.