प्रेरणा...
लिही रे कधीतरी... - प्राची अश्विनी
(पाद रे कधीतरी...)
पाद रे कधीतरी.
कसंही, अगदी कसंssही चालेल.
गडगडाटी, मध्यम, अगदी ढुसकी पण पळेल.
पण सुटलेल्या दुर्गंधाला हुंगता आलं पाहिजे.
बोटांच्या चिमटीत नाक अस्संss पकडता आलं पाहिजे.
मग शुध्द हवेसाठी तिथून लांब लांब पळेन,
अत्तराच्या तळ्यात डुबकी मारेन.
डिओच्या डोक्यावर हलकी थाप..
बेशुद्ध होण्याआधी लागेल धाप..
शुध्दीवर आल्यावर विचारात पडेन,
नक्की कशामुळे बरं मी अजून जिवंत असेन?
पण "माझ्यासाठी" पादलास! हे खासंखास
जणू प्रत्यक्ष यमराजाच्या भेटीचाच होईल भास.
....म्हणूनच म्हटलं, पाद की रे कधीतरी....