प्रेरणा...
सुप्रसिद्ध मराठी गीत - "मालवून टाक दीप... चेतवून अंग अंग"
(कालवून टाक भात)
कालवून टाक भात चिरडून कर भंग !
राक्षसा, किती भातात कोंबला तू हात थंड !
त्या तिथे उभ्या पिंपात
घातले तू दोन्ही हस्त
हाय तू मागू नकोस एवढ्यात पिण्या भांग !
गार गार या दह्यात
घालुनी बोटे सुखात
चाटुनी करून टाक पात्र सर्व शुभ्ररंग !
भुर्र भुर्र आवाजात
ढोसला सांबार मस्त
सावकाश घे गिळून एक दोन तीन वांगं !
हे तुला कधी कळेल ?
कोण उपाशी मरेल ?
थांब, का चालू असेच माकडा तुझे हे छंद ?
काय हा तुझाच त्रास ?
मरगळे, इथे उपवास !
उठ रे हळू, फाटेल तंग विजारीचा बंध !