प्रेरणा -
काळजाच्या या तळाशी राहशी तू - Deepak Pawar
बिल्डींगच्या या तळाशी राहशी तू
सारखा शेजारी माझ्या नांदशी तू
मागणे ते, "उसणवार देत जावे मी तुला!"
कसे सांगू? संयम जणू माझा मागशी तू
चव नाही माझ्या मीठाला सांगताना
का रे आता? जीभ वेड्या चावशी तू?
एवढा आता कसा हा बदलला तू
जाऊनी वाटे, माझ्याशी भांडशी तू!
आठवू मी का तुला? म्हणतोस आणिक
उसणवाराला तरी आता जागशी तू?