महाराष्ट्र कंगाल करण्याचं षडयंत्र?

गेल्या दोन महीन्यात ४ प्रकल्प महाराष्ट्राबाहेर हलवण्यात आले आहेत. त्यातील जास्तीत जास्त बेसीक सुविधाही नसलेल्या गुजरातला हलवण्यात आले आहेत. गुजराती पंतप्रधान असल्याने महाराष्ट्राचे प्रकल्प जबरजस्तीने गुजरातला नेले जात आहेत का?
१. वेदांताफोक्सकोन.
२. टाटा एअरबस.
३.बल्क ड्रग प्रोजेक्ट (औरंगाबादला येनार होता)
४. सॅफ्रोन
हे चार प्रकल्प अवघ्या दोन महीण्यात शिंदे- फडणवीस सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातून बाहेर नेण्यात आले आहेत. ह्या चारही प्रकल्पांची किंमत १ लाख ऐंशी हजार करोड आहे तसेच ह्या चार प्रकल्पांद्वारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कमीतकमी दोन लाख मराठी तरूणांना नोकर्या मिळनार होत्या. वेदांता प्रकल्प ऊध्दव ठाकरे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रातच होनार होता त्यासाठी पुण्या
जवळील तळेगावची जमीनही निश्चीत करण्यात आली होती, स्किल्ड लेबर, मूबलक पाणी, कच्चा माल, इंजीनीअर्स, ट्रांसपोर्टेशन, व्यवस्थपान हे सर्व महाराष्ट्रात पुण्याजवळ कंपनीला ऊपलब्ध होते. गुजरातमधील ढोलेराला ह्या गोष्टी ऊपलब्ध नाहीत.
ज्यावेळी वेदांता प्रकल्प गुजरातला पळवण्याचं षडयंत्र रचलं जात होतं त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे गणपती मंडंळांना भेटी देण्यात व्यस्त होते. आधीही केंद्राने आयएफएससी सेंटर जे बीकेसी,मुंबईला येनार होते ते गुजरातला हलवले.
नंतर सेंट्रल बोर्ड फोर वर्कर एज्युकेशन जे नागपूर ला येनार होते ते दिल्लीत हलवले.
एमआयएएल ओफीस मुंबईतून गुजरातला हलवण्यात आले.
एअर ईंडीयाचेओफीस मुंबईतून दिल्लीत हलवण्यात आले.
जहाज बांधनी/तोडणी चे कामही मुंबईतून गुजरातला हलवण्यात आले.
ट्रेडमार्क पेटंट ओफीस मुंबईतून दिल्लीला हलवण्यात आले.
आणखी एक नॅशनल सेक्युरीटी गार्ड आणी नॅशनल मरीन पोलीस एकेडमी पालघरमधून गुजरातला द्वारकाला हलवण्यात आली.

हे सर्व पाहील्यानर काही प्रश्न पडतात.
१)महाराष्ट्रावर केंद्राचा/मोदीशहींचा राग का?
२)इतर देशही विकसीत व्हावा असं वाटत असेल कर प्रकल्प गुजरातलाच का हवलवे जाताहेत? पंतप्रधान भारताचे आहेत की गुजरातचे?
३)१९६० साली मुंबई महाराष्ट्राला मिळाल्याच्या रागातून हे केले जातेय का? मोदी हे आधुनीक मोरारजी आहेत का?
४)त्या साठीच शिवसेनेत फूट पाडण्यात आली का? कारण विधानसभेत शिंदेंनी फडणवीसांकडे बोट दाखवून सांगीतले की कर्तेकरवते हेच आहेत. तसेच हिमालयात पळून जाईन फेम चंद्रकांत दादा पाटलांनीही आमदार कसे पळवावे लागले हे एका जाहीर सभेत सांगीतले होते. शिवसेना मराठी/महाराष्ट्र/मुंबई ह्या प्रश्नांवर जागृत असते.
५. शिंदेंना बळीचा बकरा बनवन्यात आलंय का? ह्या सर्वाचं खापर शिंदेंवर फोडून भाजप नाम निराळी राहील? पु्र्वी ज्या बोकडाचा बळी द्यायचा असेल त्याला मोकळं सोडलं जायचं गाव त्याला खाऊ पिऊ घालायचं तसं शिंदेंना मुख्यमंत्रीपद देऊन करण्यात आलंय का?
६)फडणवीस बोलले की गुजरात पाकीस्तान आहे का? मग महाराष्ट्रही पाकीस्तान नाही. तरी मराठी तरूणांच्या नोकर्यां का खाल्ल्या जाताहेत? शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की गुजरातचे?
७)फडणवीसांच्या १०० टक्के राजकारण करून पदं मिळवण्याच्या लालसेपायी ते मोदीशहांना मिळून महाराष्ट्राचा बळी देताहेत का?
८)महाराष्ट्राने २१४०३ करोड तर गुजरात ने ९०४० करोड जीएसटी सप्टेंबर २०२२ ला भरलाय. गुजरात महाराष्ट्राच्या तूलनेत जवळपास निम्म्याने मागेय. ह्या मुळेच मोदीशहांचा महाराष्ट्रावर राग आहे का?
९)सर्वात महत्वाचं, भाजपला मत देऊन मराठी माणसाने स्वतःची स्वतःच्या हाताने कबर खोदलीय का? ह्यापुढे मराठी माणसाने भाजपला मत द्यावे का?