हे सांगायला आनंद होत आहे कि शेखर कपूर यांच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार्या प्रदर्शनात माझा "वारी" फोटो प्रदर्शित होणार आहे . जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी या प्रदर्शनात माहितीपट, व्लॉग, छायाचित्रे असतील. परभन्ना फाऊंडेशनने महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन केले आहे.
स्थळ - नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया, लॉ कॉलेज रोड, पुणे
वेळ - सकाळी 10 ते दुपारी 2
तारीख - 27 सप्टेंबर 2022
मी साधारण ११ वाजल्यापासून तिकडे उपस्थित असणार आहे. सकाळ पासून तिकडे माहितीपट, व्लॉग दाखवले जाणार आहेत, एका परिसंवाद पण आयोजित केला गेला जाणार आहे. मुख्य कार्यक्रम म्हणजे पुरस्कार सोहळा १ ते २ असणार आहे.
कृपया ज्यांना जमले त्यांनी अवश्य भेट द्या.