सावधान: लेखाची सुरुवात सूचनेने करावी लागते आहे कारण ही भटकंती थोडी धोकादायक असू शकते. ठाणे पश्चिमेला संजय गांधी उद्यानाची पूर्व सीमा आहे. हे एक प्रतिबंधित क्षेत्र असून यात बिबट्याचा वावर आहे.
बिबट्या तसा संध्याकाळ ते सकाळ वावरतो. दुपारी जाऊ शकतो. ज्या मामाभानजे डोंगर भागात जाणार आहे तिथे दरगाह असल्याने माणसांचा दिवसा खूप वावर,येजा असते. तसा धोका नाही.
करोना प्रतिबंध कमी होऊन वावर हल्लीच सैल झाल्याने आणि पाऊस चांगला झाल्याने इकडे १८ ओगस्टला गेलो होतो.
मी गेलेलो मार्ग दिला आहे पण इतर कार,विमान, साधनांचाही उपयोग करू शकता.
मुंबई एरपोर्टहून taxiने लोकमान्यनगर किंवा वागळे आगार दर्गा एंट्री ला जाऊ शकता.
स्वत:च्या वाहनाने लोकमान्यनगर कडेच जावे, तिथे पार्किंग आहे. परतताना चहाटपरीपासून खाली येताना डावीकडची वाट पकडल्यास पार्किंगला जाईल, उजवीकडची पकडल्यास हनुमाननगर वागळे एअरिआत जाल. ठाणे स्टेशनकडून बसने कोणतीही वाट चालेल.
मामाभानजे डोंगराची उंची लोकमान्य नगरपासून(ठाणे)तळापासून साधारण ३६० मिटर्स आहे. म्हणजे फार उंचावर नाही. वाट अडीच किमी दगडी पायऱ्यांची चांगली आहे. वागळे आगार- हनुमाननगर मार्गाची वाट पहिल्या वाटेला चहानाश्ता टपरीपाशी अर्ध्यावर मिळते. फरक म्हणजे पहिल्या वाटेने तीन झरे आहेत.
फोटो १
Thane West to Lokmanya Nagar,6.3 km, bus route 23
फोटो २
Lokmanya Nagar to Mama Bhanje hills walk.2.4 km
फोटो ३
Mama Bhanje hills to Wagale Depot walk.2.4 km
फोटो ४
Wagale Depot to Thane stn. West , 5.6 km,bus route no. 6
मामा भानजे ट्रेकचे विडिओ
विडिओ ४ https://youtu.be/pY3fDOxfoaA
विडिओ ३ https://youtu.be/lvPCCtcqyZg
विडिओ २ https://youtu.be/9o8qJ7gB8mI
फोटो स्लाईड शो.
विडिओ १ https://youtu.be/hvRjowP-eiI
___________________