दिवाळी अंक २०२२ - चर्चा

नमस्कार!

तर महत्वाचा विषय म्हणजे विषय काय असावा.???

तर कळवा आपली मतं. लौकरात लौकर आपण विषय ठरवू कामाला लागुया....

तारीख पे तारिख व्ह्यायला नको, म्हणुन...

लक्ष्मी-पुजन शनिवार २४ ऑटोबर हे लक्षात घेवुन पुढच्या तारखा सुचवतो (एक अंदाज). काहि बदल करायचा असल्यास सुचवा

∴ अंक प्रकाशनः (ऑनलाईन) २२ ऑटोबर
∴ लेख देण्याची शेवटची तारीख - १० ऑटोबर
∴ जाहीर आवाहन करण्याची तारीख - ५ सप्टेंबर

टीम्स
यावर्षी मोर्चा बुवा सांभाळतील. दिवाळी अंकात सासंबरोबर दर वेळी काही स्वयंसेवक आपणहून सामील होतात. कोणी संपर्क केल्यास त्यांना इथे घेवु
दिवाळी अंकाचे काम नेहमिप्रमाणे विशेषांक चावडी मधे होइल म्हणजे
१) आलेले लेख विशेषांक चावडीत प्रकाशित करणे
२) लेखकाला पोच देणे
३) लेख अंकात घ्यायचा कि नाहि यावर मत
४) स्विकृती अ-स्विकृती कळवणे
५) मु शो (नूलकरकाका )
६) सजावट (CSS , चित्र ......) (टर्मिनेटर)
७) अंकासाठी लेख तयार करणे. ( प्रतिक्रिया हटवून प्रकाशित करणे)
८) अनुक्रमणिका
९) मुखपृष्ठ (वा ग बोंद्रे)
१०) अंकाची जाहिरात (मिपावर आणि मिपाबाह्य ठिकाणी)

काही तांत्रिक अडचण आल्यास नीलकांत आणि प्रशांत आहेच

चला लवकर टिम बनवु या.. बोला कोण पयला...

-----------------------------------------------------------------------------------
चला चर्चा करूयात..

१. लक्ष्मीपूजन = २४ ऑक्टोबर २०२२

२. विषय असावा का/कोणता असावा?

३. जबाबदार्‍या - कोण कोण स्वतःहून काय काय करणार? राहिलेल्या गोष्टी कोण कोण करणार?

४. अंदाजे टाइमलाइन - (यात कमी जास्त सुचवा)
३१ ऑगस्ट - श्रीगणेशलेखमालेसोबत दिवाळी अंकाचे आवाहन
दीड महिना लेख येण्यासाठी
१५ ऑक्टोबर लेख देण्याची अंतिम मुदत.

५. लेखकांना व्यनि पाठवून लेखन पाठवण्याची विनंती करणे (मागच्या वर्षी १९२ जणांना व्यनि केला होता)

६. .....