आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात लिहावे आणि नवीन मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती.
काल उध्दव ठाकरेंनी त्यांच्या अजूनही नियंत्रणात असलेल्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख- नेते यांच्यापुढे भाषण करताना दोन आरोप केले.
पहिला आरोप म्हणजे 'त्यांनी' माझ्या कुटुंबीयांचा आणि माझा अपमान केला. वा रे वा. तुम्ही इतरांच्या कुटुंबियांना कसे वागवत आला आहात उध्दवजी? तुम्ही इतरांचा आणि इतरांच्या कुटुंबियांचा सन्मान करत आला आहात का? २०१४ च्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळेस नरेंद्र मोदींच्या दिवंगत वडिलांच्या नावाचा उल्लेख तुम्ही केला होतात हे आम्ही विसरलेलो नाही. नरेंद्र मोदींचे वडील मोदी राजकारणात यायच्या कितीतरी वर्षे आधी गेले. मोदींच्या वडिलांचा राजकारणात अजिबात काहीही भाग नव्हता आणि ते एक सामान्यातील सामान्य व्यक्ती होते. तरीही त्यांचा प्रचारसभेत तुमच्या राजकारणासाठी तुम्ही उल्लेख केलात तो मोदी कुटुंबियांचा केलेला अगदी सन्मानच होता नाही का? दुसरे म्हणजे अटलबिहारी वाजपेयींचे १६ ऑगस्ट २०१८ रोजी निधन झाल्यानंतर सामनातून वाहिलेली गटारगंगा विसरलात का उध्दवराव? वाजपेयींचे निधन आधीच झाले होते पण ते १५ ऑगस्टपूर्वी जाहीर केले असते तर दुखवटा लागला असता आणि मोदींना निवडणुकीपूर्वीचे शेवटचे १५ ऑगस्टचे भाषण लाल किल्ल्यावरून करता आले नसते ते व्हायला नको म्हणून वाजपेयी गेल्याची बातमी नंतर जाहीर करण्यात आली हे तारे सामनामधून तोडले गेले होते. असे अनर्गल बोलून वाजपेयींची दत्तककन्या नमिता आणि तिची कन्या (वाजपेयींची नात) निहारीका यांना काय वाटेल याची पर्वा तुम्ही केली होती का?
दुसरा आरोप म्हणजे 'ते' माझ्या आजारपणाचा राजकीय कारणासाठी गैरवापर करत आहेत. There you go. २०१८ मध्ये मनोहर पर्रीकर आजारी असताना ते अमेरिकेला उपचारांसाठी गेलेले असताना गोव्याला आजारी राज्य म्हणून जाहीर करा असे ही गटारगंगा सामनामधून कोणी वाहिली होती? पर्रीकरांच्या आजारपणाचा तुम्ही कोणत्या कारणासाठी वापर तुम्ही केला होतात?आणि तेव्हा पर्रीकरांच्या कुटुंबियांना कसे वाटेल याची पर्वा तुम्ही केली होतीत का?
उध्दव ठाकरेंनी केलेले आरोप कितपत खरे आहेत याची कल्पना नाही. पण ते खरे असतील तर 'करावे ते भरावे' या उक्तीचा थेट अनुभव उध्दव घेत आहेत याची प्रचिती आली.