३ मे: शंभर शब्द ? आता लिहितो. हाकानाका. स्पर्धा जिंकणारच...
[पुढचे काही दिवस]
विचारपुर्वक लिहायला हवं. घाईगडबड नको, स्पर्धा जिंकायचीये.
काय लिहू...? राजकीय, कोरोना, युद्ध ईत्यादी की विनोदी ,भावूक ,सायफाय, बोल्ड, समलिंगी वगैरे.
सुचत नाहीये
बाकीचे लिहित आहेत, मतं पण मिळतायत
जाऊदे... शशक लिहून का कुणी लेखक होतो..?
हिच संधी आहे. लिहायला हवं...
आणखी सुधारणा हवी.. स्पर्धा जिंकायचीये
प्रत्येक शब्द मोलाचा आहे , सुधारणा करायला हवी.
२५ मे
१२:०० ट्विस्ट कळेल ना ?
१७:०० शेवटचा हात फिरवतो; स्पर्धा जिंकायचीय
२२:०० ढासू झालीये , पण शीर्षक बदलावं का ?
२३:५८ व्यक्तिगत संदेश... हुश्श पाठवली ..
२३:५९ मिपा स्लो झालंय ?
२६ मे ००:०० "500 internal error" ? ओह नो ..