प्रसिद्ध उद्योजक द्वारकानाथ बोर्डमिटींग संपवून घरी आल्यावर केदारने आग ओकली.
"नवीन डीशवॉशर व वॉशिंग मशिनसाठी रिसर्च मी केला, प्रॉड्कट टीम व तंत्रज्ञान विकसित मी केले, मार्केटींग, डीलर नेटवर्क मीच पहातोय. मी सिईओ आहे कंपनीचा तरी तुम्ही कंपनीच्या समभागापैकी अर्धे करणला देता. करण माझा धाकटा भाऊ पण काय केले आत्तापर्यंत? धड शिक्षण नाही, टोळ्भैरवांना धरून झोपडपट्ट्यांमध्ये हिंडतो, कामवाल्यांना, कामगारांना त्यांचे हक्क वगैरे फालतू लेक्चर देतो. माझे मित्र म्हणाले की हे लोण सगळीकडे पसरतेयं. बर्याच जणांनी काम सोडले. कामवाल्यांच्या डिमांड वाढल्यात आता. अश्या माणसाला ५०% हिस्सा का?"
द्वारकानाथ हलकेच हसून म्हणाले," हेच तुला कळत नाही. प्रॉडक्टला मार्केटच नसेल तर ते घेणार कोण?"