शशक'२०२२ - विश्वास

अनिरुद्ध
येस्स! आम्ही 2122 मध्ये सुखरूप पोचलोय! आता इस्रो मध्ये जाउन गेल्या 100 वर्षातली जर्नल्स भरभर चाळायला हवीत.

हुश्श! इथल्या सिस्टिम्स वापरताना चांगलीच तारांबळ उडाली! अरुंधती तर घाबरलीच होती... एवढी हुशार क्वांटम फिजिकिस्ट, पण लहानसहान गोष्टीनं भीते! माझ्यावरच्या प्रेमापोटी आणि विश्वासापोटी ती या कालप्रवासाला तयार झाली... असो, आता अभ्यास!

अरे वा! कालप्रवासाच्या शोधाबद्दल अरूंधतीला नोबल प्राइज मिळालाय! पण यात माझं नाव कसं नाही?

अरुंधती
अनिरुद्धचा टाइम ट्रॅवलचा... सॉरी, कालप्रवासाचा! शोध सक्सेसफुल झालाय. आता मला एकच गोष्ट करायचीय... तो रात्री झोपला, की एकटीनं टाइम कॅप्सुल घेऊन 2022 मध्ये परत जायचं. मग पैसा, प्रसिद्धी आणि नोबल प्राइज... सगळं काही माझं. माझं एकटीचं!