शशक'२०२२ - पढाई

"अम्मी मी इथं नाही राहणार,अब्बू को बोल मुझे यहांसे ले जाए".
"नही बेटी तूझे वहा रहके पढना होगा. तुझ्या चार भावांचा विचार कर बेटी. अब तुझेही संम्भालना हैं सब".
"नही अम्मी यहाँ बहुत डर लगता हैं".
"मास्तर नेक दिल नाहीये, शिकवताना कुठेही हात लावतो. नजर वाईट आहे".
"तू लक्ष देऊ नकोस. अबू गांव गये हैं.
ते आले की बोलायला सांगते त्यांच्याशी".
"तू वहा मन लगा के पढना बेटी".
----------------------------------------------------
"हॅलो मी इन्स्पेक्टर वाळे बोलतोय, तुमची मुलगी फातिमा...."
"क्या हुवा उसको ती ठीक आहे ना?"
"उसे कुछ नहीं हुवा हैं. उसके मास्तर को हुवा हैं".

"तिने टोकदार पेन्सिलने मास्तरांचा डोळाच फोडलाय".