गेली बारा वर्षे मी इथेच आहे. रोज तिला मी या शो केसेमधून पाहतोय. ती मोठी झाली आणि मी बेडवरून शो केसमध्ये आलो. आता तिच्या एका कटाक्षाची वाट बघत असतो.
आज तिने मला बाहेर काढले. सगळी धूळ स्वच्छ केली. मागची चेन काढली आणि नवीन कापूस भरून मला आधीसारखे गुबगुबीत केले. नंतर बाजूच्या गिफ्ट बॉक्समध्ये पॅकही करुन टाकले.
आमची ती शेवटची भेट. आता कदाचित मला नवीन मैत्रिण मिळणार होती. मी वाट बघत राहिलो. अखेरीस तो बॉक्स कोणतरी उघडला आणि बॉम्बसारखा धडाम आवाज माझ्या कानात घूमला.
.
.
"घाबरलीस का ग ? अग राजेश खाली बॉम्ब फोडतोय. काढ तो टेडी बेअर आणि सगळ्यांनी मिळून खेळा त्यासोबत !"