शशक'२०२२ - अनोळखी मदत

"अहो, शुकशुक , अहो लाल शर्टवाले, हां इकडे इकडे वर वर…"

"जरा वरती या ना; मदत पाहिजे मी अडकलोय इथे, दरवाजाला बाहेरुन कडी लावली आहे कोणीतरी ती काढा ना."

" इथुन मागे या, तिकडेच जीना आहे."

धापा टाकत तो शेवटच्या मजल्यावर आला, अंधरवजा बोळात एक शिसवी लाकडाचा प्रचंड दरवाजा दिसत होता, कडी नव्हतीच त्याला.

हँडलला जोर लावुन त्याने तो ढकलला तसा करर्र आवाज करत तो उघडला, आत काहीच दिसत नव्हतं बर्याच दिवस खोली बंद असली तर जसा कुबट वास येतो तसा भपकरा आला. त्याच्या हाताला हिसडा बसला आणि तो आत ओढला गेला..
----------------------------------------------------------------------------------
"अहो शुक शुक , अहो सायकवाले मामा हां इकडे इकडे वर…"