शशक'२०२२ - बक्षीस

स्पर्धेसाठी बाबाने वेळात वेळ काढून बनवून दिलेला परीचा ड्रेस घालायला सई जराशी नाराजच होती. अशी काय परी असते का? पांढराशुभ्र गाऊन आणी काळे पंख पाठीवरच्या पेटीला जोडलेले. थोडी जड पण लागत होती ती पेटी. सगळ्या बाकीच्या पर्या रंगीबेरंगी…सोनेरी…चमकदार कपडे ..पंख मीरवत एंट्री घेत असताना ती अजुनच हीरमुसत होती.
तीचा नंबर पुकारला गेला, ती स्टेजवर गेली बाबाने सांगितले होते ते खिशातले रीमोट चे बटण गुपचुप दाबताच घुर्र्रर्रर्र असा आवाज चालू होऊन ते..पत्र्याचे पंख एका वीशीष्ट कंपनतेने थरथरू लागले. आणि सई हलकेच हवेत तरंगू लागली खर्याखुर्या परी सारखी…घरी पोहोचल्यावर ती हातात बक्षीस धरून बाबाच्या प्रयोगशाळेच्या दिशेने धावत सुटली