सुर्य क्षितिजाआड गेला, मावळतीचे रंग गडद व्हायला लागले तसे त्याचे मन निराशेच्या गर्तेत खोलखोल बुडाले.
.
.
टेरेसवर बसुन सुर्यास्त पहात असताना त्यांची ओळख झाली होती. गप्पा वाढल्या, जवळीकही वाढत गेली. काल धाडस करुन त्याने तिला मिठीत ओढले अन ओठांवर ओठ टेकवले. ती बिथरली.
"नको ना. इथे टेरेसवर येईल कोणीतरी. उद्या गावी जाणार आहेत घरचे. तेंव्हा भेटु."
इतका सुंदर नकारातील होकार ऐकुन तोही रोमांचित झाला !!
.
.
पण आज ती आलीच नाही. खिन्न मनाने पायर्या उतरताना त्याची नजर तिच्या फ्लॅटच्या बंद दरवज्यावर धडकली.
.
.
दरवाजा अचानक उघडला अन नाजुक हाताने अलगद त्याला आत खेचले.
भान आले तेव्हा खिडकीबाहेर, क्षितिजाकडे नजर गेली - तिच्या अनावृत्त कटीमागुन सुर्य उगवत होता.