शशक'२०२२ - चॅरिटी

बरीच वर्षे घासून एममएनसीत नोकरी लागल्यावर लै खूष झालो. दुसर्‍याच माहिन्यापासून चॅरिटीसाठी विनंत्या येउ लागल्या. माझं सहकारी, मित्र-मैत्रिणी आणि परिवारवर्तुळ इतकं मोठं असल्याचं मलाच आश्चर्य वाटलं. सामाजिक परिस्थिती गंभीर होती. कुणाला कचरा वेचक आणि मैला साफ करणार्यांना संरक्षक वस्तू द्यायच्या होत्या, कुणाला दरवर्षी लाखोंच्या संख्येने शिक्षण अर्धवट सोडणार्या मुलींना सॅनिटरी पॅड्स द्यायचे होते. कुणाला गरीब पण हुशार मुलांच्या शैक्षणिक जबाबदार्या घ्यायच्या होत्या अश्या एक-न-अनेक. त्यातच जोडीला आता करोना. खोटं कशाला सांगू? या सगळ्या लोकांना काय कारण देवू याचं भयंकर टेंशन आलं.

दुसर्‍या दिवशी शंभर रुपये भरून एका एनजीओत नाव नोंदणी केली. अफ्टर ऑल अ‍ॅटॅक इज दि बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स!