“युद्ध सीमेवर फार कमी लढले जाणार आहे. शत्रू आता सरकार, प्रशासन , न्यायपालिका , विद्यापिठे, माध्यमे , इत्यादी महत्वाच्या संस्थांमधे शिरकाव करतील. देश खिळखिळा करून घाव घातले जातील. असे युद्ध कमी खर्चाचे व परिणामकारक असेल” राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत सुरक्षा सल्लागार बोलत होते.
“श्रीलंकेत युद्धाविनाच लोकनियुक्त सरकारला पदच्युत केले तेच युक्रेनमधे युद्ध करूनही शक्य झालेले नाही !” संरक्षण प्रमुखांची सहमती.
“या विरूद्ध आपली तयारी काय ?” अध्यक्षांचा रोख महंतांच्याकडे होता.
“सर, महंतजींचा “लक्ष्यभेद” प्रकल्प पुर्ण झाला आहे.” सल्लागारांनी सांगितले. “माणसाच्या मनातल्या विचारांचे मॅपिंग आपण करू शकतो.”
सगळ्यांच्या माना महंतांच्याकडे वळल्या.
महंत ध्यानमग्न अवस्थेत एकएकाच्या मनाचा ठाव घेत होते. सगळे उच्च पदस्थ एकाच वेळी क्वचितच उपलब्ध असतात.