काय म्हणावं या बाईच्या जन्माला. दिवसभर स्वयंपाक घरात आणि रात्रभर बिछान्यात. नुसती तगमग. नवरोबा दिवसभर चड्डीवर हिंडतो, रात्री तर सांगायलाच नको. कसाबसा दिवस जातो कामामध्ये पण रात्रीचा त्रास काय सहन होत नाही.
सांगता कोणाला. शेजारची जोशीण बाई टोमणा कसा मारते, "आमच्या ह्यांना नाही बाई एवढं सांगावं लागत, एकदा सांगितले कि चुपचाप ऐकतात".
सोसलं, सोसलं शेवटी काल यांना दमच दिला. म्हटले, आता जर रात्रीचा त्रास बंद झाला नाही तर खेटरान् पूजा करेन.
इन्व्हर्टर आणि AC ....जाळ आणि धूर संगटच ..ख्याक. सकाळीच बसवून गेले लोकं.
आज रात्री शरीराला गारवा भेटेल, मनाला दुपारपासूनच मिळाला, जेव्हा सोसायटी मध्ये AC ची जाहिरात करून आले तेव्हापासून.