सुखी कुटूंब.आईबाबा,भाऊ,आजी, आजीची लाडकी.
आजोबांच्या पाऊलवाटेवर चालत नुकतीच ती पण डाॅक्टर झाली.आजीला केव्हढा अभिमान .....
महामारीने विक्राळ रूप धारण केले.सारे चिंताग्रस्त पण ती मात्र बिनधास्त. शेजारी पाजारी नाती दुरावली.
पहिल्यांदा भाऊ,आजी आणी पाठोपाठ आई.....उरले फक्त बाबा आणी तीच.
काही दिवसांनी एक आजी वाॅर्ड मधे आल्या.आजी नातीचे नाते जुळले.
"मला कुणीच नाही,शेवटचे करशील ना", म्हणत आजीने बांगड्या हातावर ठेवल्या.अश्रु सुकले होते. निशब्द झाली.
शब्दाला जागली...
महिन्याभराने अधिक्षकांनी कार्यालयात बोलावले.त्यांच्या समोरच्या अधेड व्यक्तीने विचारले, आजीच्या हातात सोन्याच्या बांगड्या होत्या ना?
यंत्रवत फाॅर्मवर बांगड्या मीळाल्याची सही घेतली.
" sonya s".
थंडपणे पुन्हा कामाला लागली.