शशक'२०२२- सामना

विश्वचषकाचा अंतिम सामना ऐन रंगात आला होता. ह्याच्या संघाने मागील विश्वचषकात अंतिम सामन्यातच माती खाल्ली होती. समोरचा संघ पण खूपच चिवट होता, त्यांनी कधीच विषवचशक जिंकला न्हवता हा सामना त्यांच्यासाठी सुद्धा महत्वपूर्ण होता.

आत्तापर्यंत सगळ्याच फलंदाजांनी गुढगे टेकले होते आणि धावांचा तर डोंगर पार करायचा होता. पण कप्तानाला साजेल असाच खेळ करून त्याने धावफलक सतत हलता ठेवला होता. आता केवळ ३ धावा १ चेंडूत हव्या होत्या.

पण हाय देवा...

जे व्हायचं तेच झालं, शेवटच्या चेंडूत हा झेलबाद झाला.

तंबूत परतताना त्याच्या तोंडावर निराशा होती तरी त्याच्या बुकीला अंगठा दाखवायला तो विसरला न्हवता. धावफलका प्रमाणेच त्याने सट्टाबाजार सुद्धा हलता ठेवला होता.