शशक'२०२२- सेन्सेशन....

या रोज रोजच्या प्रोब्लेम्सने वैताग आला आहे !
काय तेच तेच महागाई , गॅस , पेट्रोल... माझे बरे आहे , घरी विचारणारे कोणी नाही , पण लोकांचे तोंड कोण बंद करणार ? खरच लोकांना दुसरी काही कामे नाहीत काय ? विरंगूळा म्हणून आयपीएल बघावे तर तेही फ्लॉप चालले आहे.. तिकडे बोर्डर पलीकडे पाकिस्तानचे ल लागल्याने त्याही बातम्या नाहीत..
यावर काहीतरी उपाय करायला हवाच ! लाईफ मध्ये नवे काहीतरी सेन्सेशन हवे, एक्साईट्मेंट हवी.. तर प्रोब्लेम, दु़: ख विसरले जाईल ,..

एकच खात्रीशीर उपाय..

आज रात ८ बजे.. मिट्रो ...