“आर्टीफिशिअल इंटेलिजन्सची कमाल आहे”
“पण हे सॉफ्टवेअर कसं काम करतं?”
“भूतकाळातल्या व्यक्तीचं लेखन आणि त्या व्यक्तीचा मूळ आवाज या सॉफ्टवेअर मध्ये फीड करायचा”
“ओके मग?”
“हे सॉफ्टवेअर ती सर्व माहिती प्रोसेस करतं”
“आणि त्या व्यक्तीचा मूळ आवाज शोधून काढतं?”
“फक्त शोधून काढत नाही, तर त्या व्यक्तीच्या मूळ आवाजात बोलतं सुद्धा”
“महाराजांशी सुद्धा बोलता येईल?”
“नाही, मूळ आवाजाचा नमुना फीड करावा लागतो”
“ओह.. आता मग कोणाशी बोलता येईल?”
त्या सायंटिस्टने कॉम्पुटरच्या स्क्रीनच्या पहिल्या नावावर क्लिक केले
“हॅलो हाय.. सर... इज धिस मिस्टर बोस?”
“येस”
“सर.. हाऊ डिड यू डाय?”
तो आवाज हलकेच हसतो आणि म्हणतो..
“इट वॉज ए वेल प्लॅन मर्डर”