शशक'२०२२ - रँगो

गरुडाच्या भीतीने बाटलीत लपलेल्या सरड्याची अवस्था भयंकर झाली जेव्हा गरुडाने बाटलीच उचलून आकाशात भरारी घेतली आणि उंचावरून खाली सोडून दिली.

आपला मृत्यू अटळ आहे याची त्याला खात्री पटली. घाबरून त्याने डोळे घट्ट मिटून घेतले.

मृत्यूचे जवळून दर्शन त्याने यापूर्वीही घेतले होते जेव्हा काचेच्या “सुरक्षित” पिंजऱ्यातून सुटका होऊन तो मुक्त जगात दाखल झाला.

बाटली पडली पण फुटली नाही, कारण ती एका बेडकावर पडली.

बाटलीत शिरण्याची केविलवाणी धडपड करणाऱ्या बेडकाचा गरुडाने क्षणार्धात घास घेतला.

याच बेडकाने त्याला ऐनवेळी गरुडापासून सावध केले होते आणि तो बाटलीत लपला होता.

मृत्युंजय सरडा मोठ्या दिमाखात बाटलीतून बाहेर आला

आणि पुन्हा एकदा निघाला ......... एकटाच...... मृत्युच्या दिशेने.......