गावातील पट्टीच्या पोहनार्याने मृतदेह ओढून आणला. पोलिस गाडी नी पाठोपाठ ऐंब्युलन्स निघाली.
कोवळा मृतदेह पाहून डाॅक्टरना वाईट वाटले. “पोहता येत नाही तर खोल तलावात गेलाच का?”
पांढरे शर्ट नी काळी पॅंट घालून जमलेल्यात सरांचं जोरदार आगमन झालं. “कंपनीचं प्रोडक्ट विकून तुम्ही सप्लाय चेन चा एक भाग होनार, नंतर ज्याला प्रोडक्ट विकलंय त्याने पुढे विकलं की तुम्हाला त्यातले “क्षक्ष” टक्के मिळनार, हा पहा अजय ह्याने शिकत हे केलं नी आज त्याच्या अकाऊंटला ५ लाखांचा बॅलन्स आहे.”
“मी कर्जाने पैसे घेऊन हे प्रोडक्ट घेनार नी लोकांना विकून थोडे कमावेन, तेवढंच शिकता शिकता घराला हातभार.”
“आणी ईतके पैसे परत नाही फेडले गेले तर??”