ट्रेन स्टेशनमधुन निघाली . त्या दोघांनी धावतपळत आपला डबा गाठला .
" हे दागिने ." तिने आपल्या बॅगमधला डबा काढुन त्याला दिला .
"आईबाबांना न सांगता मी त्यांचे दागिने घेतले . आपण सेटल झाल्यावर त्यांना नक्की परत करु ." ती रडु आवरत म्हणाली .
"जरुर . गावाकडे चाचुचा बडा कारोभार आहे . आपण त्यांच्याकडेच राहुया ."
"आई बाबांनाही आपल्याकडेच बोलवुन घेउ ." ती म्हणाली .
त्याने तिला हलकेच थोपटले . तिला गाढ झोप लागली .
त्याने उठुन टॉयलेटमधे जाउन फोन लावला .
"आज और एक शिकार फस गयी ."
" शाबास . एक दिन पुरी कायनात हमारी होगी ."
"बेशक ." असे म्हणत तो बाहेर येताच त्याला कमांडोजनी ताब्यात घेतले .
ती जागी झाली तेव्हा तिचे आई बाबा तिच्याकडे अभिमानाने पाहात होते .