शशक'२०२२ - मोबदला

“रमाकांत त्यादिवशीसारखं आज याल का संध्याकाळी माझ्याबरोबर घरी.तुम्हाला पाहिजे तो मोबदला देईन.”रेवतीनी मधाळ आवाजात विचारलं.
“रेवती,काही काळजी करू नका ,रमाकांतला वेळ नसला तर मी येईन तुमच्याबरोबर.तुमची सगळी कामं करून देईन.बाईक आहेच माझी.” रमाकांतनी ऊत्तर द्यायच्या आत मी मध्येच बोललो.
रेवतीनी मला वरपासून खालपर्यंत न्याहाळलं.
इकडे रमाकांत जोरजोरात मान हलवत मला खूणा करत होता.मी दुर्लक्ष केलं.
“रमाकांत,मी तुम्हाला दिलेला नॅपकिन यांना द्या.”
संध्याकाळी मी शीळ घालत रेवतीच्या टेबलपाशी गेलो.
रेवतीने आंब्याच्या पेटीकडे बोट केलं,” ही पेटी घरी न्यायची आहे.नॅपकीन घेतलात ना.खांद्यावर पेटी ठेवताना लागेल तुम्हाला.रमाकांतला मी पैसे देते,तुम्हाला कॅाफी देईन.”