नमस्कार लोक हो !
सध्या करोना आणि ओमिक्रोनचा धोका असुनही सगळे जग पुन्हा आपापले नित्याचे व्यवहार सुरु करण्याच्या मार्गी लागले आहेत.
या एप्रिल मे मध्ये सहकुटुंब युरोप सहल करण्याचा मानस आहे तेव्हा काय करावे यासाठी हा धागा.
ही वेळ (season) तिथे फिरण्यासाठी चांगली की सप्टें ते डिसेंबर हा काळ अधिक चांगला असतो? खरं तर हा प्रश्न विचारला की कोणती स्थळे तिकडे कोणत्या ऋतुत बघता येतात / बंद असतात ते कळावे म्हणुन.
सर्व प्रथम विमान प्रवास चालु आहे की नाही हे नक्की कसे कुठे पाहायचे आणि तिकीटाचे दर कसे ठरवयाचे, कोठे उतरायचे, हे सर्व कसं पार पडेल याची काळजी लागुन राहली आहे. कारण कोणती ही टुर कं.नी अजुन निटशी माहिती देत नाहीयेत.
अजुन दोन महिन्यांनी नक्की परिस्थीती कशी असेल हे काही सांगता येत नाहीये.
तसेच करोना मुळे बाहेर फिरायला जाणं हे जास्त धोकादायक आणि पहिल्या पेक्षा जास्त खर्चिक असणार की कसं? तुम्हाला काय वाटतंय?
की मी जाणं रद्द करावी आणि अजुन एक वर्ष वाट पहावी?
आग्रीम धन्यवाद.