D I Y घरगुती दुरुस्ती

DIY
घरगुती दुरुस्ती

माइक्रोवेव अवनची panel buttons काही बंद पडलेली. पण स्टार्ट बटन चालत होते. तसंच काम भागत होते. पण परवा तेही बंद पडल्यावर रिपेरिग करणे आले. आता आठ दहा वर्षांनी नवीन panel सर्वच मॉडेल्सची मिळतीलच असं नाही.
यूट्यूबवर काही विडिओज पाहिले. मग उघडून फॉल्ट सापडला. बटणाच्या वायरी प्रिंटेड सर्किटमधून एका कनेक्टिंग रिबनने जोडल्या आहेत . त्याच्या लीडस आणि बटण यांमध्ये ब्रेक सापडला. जंपर वायर जोडल्या आणि सर्व बटन्स चालू झाली.
फोटो

२.
ऐन दिवाळीत टीवी स्क्रीनवर आडव्या लाईन्स आणि फ्लिकरिंग सुरू झाले. दिवाळीमुळे चमचम रोषणाई विजेच्या माळा लावल्या जातात त्यानेही होऊ शकते. पण नंतरही तसेच राहिले. उघडून पाहिल्यावर समजले की बटणाच्या वायरी एका कनेक्टिंग रिबनमधून जिथे जोडल्या होत्या त्यात कनेक्शन लीड्स गंजले आहेत. ते उघडून जरा स्वच्छ केल्यावर फॉल्ट क्लिअर झाला. ( हल्ली सीआरटी पिक्चर ट्यूबवाले जुने टिवी नसतात ,त्यात वरच्या बाजूला ट्यूबवर बंद असतानाही इलेक्ट्रिर चार्ज असतो. एलसीडी/एलईडी स्क्रीनवाल्या टीवीत हा धोका नसतो.)

वापरलेली उपकरणे
साधा कृन्टिन्युईटी टेस्टर
सोल्डर गन २५ वॉट.,
सोल्डर वायर, फ्लक्स पेस्ट.
जंपर वायर . फ्लेक्सिबल कोटेड वायर.
चाकू, स्क्रू ड्राइवर,
ब्रश, चिकटपट्टी.

____________
सूचना
इलेक्ट्रिकची कामे आहेत. कुणाच्या मार्गदर्शनाखाली काम करावे.

चुका आणि सूचनांचे स्वागत.