'शेळी जाते जिवानिशी आणि खाणारा म्हणतो वात्तड कशी?' म्हण सुपरिचित आहेच. मेमे व्हायरल करणार्यांचे म्हणी बनवणारे पुर्वज असावेत कि काय अशी शक्यता वाटते. या म्हणी वापरण्यास सुलभ असल्यातरी बनवणे आणि व्हायरल करण्याचे कौशल्य सोपे नसावे. 'जाणारा जातो जिवानिशी आणि मास्क न वापरणारा म्हणतो मास्क कशाला' अशी म्हण जाणिव पुर्वक बनवली तरी व्हायरल करणे कठीणच.
तर असाच प्रश्न अस्मादिकांना वात्तड चकली जाणीवपुर्वक कशी बनवावी असा पडतो. असे बर्याचदा होतेना इतरांना चुकलेला वाटणारा पदार्थ आपल्या आवडत असावा आणि पदार्थ त्या कथित चुकीच्याच पद्धतीनेच बनवून द्या म्हणणे एकदम ऑकवर्ड होऊन जाते पण इतरांच्या दृष्टीने चुकीचा पदार्थ आपल्या जाम आवडीचा असतो. म्हणजे असे की उर्वरीत जगतात खुसखुशीत चकली आदर्श समजली जात असली तरी आम्हाला ती न तुटता उकलून बघता येणारी दातांना व्यायाम देत चव चघळता येणारी वात्तड स्वरुपातच (शपथपुर्वक खरे खरे ) आवडते . म्हणजे यात विनोद व्यंग सर्कॅझम मुळीच नाही असे सांगूनही चकली बनवणार्या सुगरणांना अशी आवड शक्य वाटत नाही आणि जाणीवपुर्वक वात्तड चकलीची रिसिपी कशी मिळवावी हा प्रश्न परिचित चकली बनवणार्यांनी सोडवलेला नाही. तेव्हा कुणि मिपाकर वाचक लेखकांच्या गंभीर मार्गदर्शनाची 'वात्तड चकली (खरेच) कशी बनवावी?' या बाबत धीरगंभीर प्रतिक्षा आहे.
* प्रतिसादांसाठी आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार