चालू घडामोडी ऑक्टोबर २०२१ - भाग ३

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक एन.सी.बी प्रमुख समीर वानखेडेंवर भलतेच संतापलेले दिसत आहेत. समीर वानखेडेंनी खोट्या केस टाकून आर्यनला अडकवले आहे तसेच आपल्या जावयाला अंमली पदार्थ प्रकरणी अटक केली आहे त्याच्याकडे अंमली पदार्थ नव्हते तर हर्बल वनस्पती होत्या वगैरे वगैरे तारे तोडले आहेत. काल तर समीर वानखेडे वर्षभरात नोकरी गमावून तुरूंगात गेलेले असतील हे भाकितही नवाब मलिकांनी केले आहे. इतकेच नाही तर देशातील लोक वानखेडेंना गजाआड गेलेले बघितल्याशिवाय शांत बसणार नाहीत असेही मलिक म्हणाले आहेत. काल तर मलिकांची जीभ पूर्णच घसरली. समीर वानखेडेंचा बाप बोगस होता, घरचे बोगस होते वगैरे तारेही त्यांनी तोडले आहेत. एक गोष्ट कळत नाही- एखाद्याचा बाप आणि घरचे बोगस होते हे त्याला तुरूंगात टाकायचे कारण कसे होऊ शकेल?

1

आता यात एक अडचण झाली आहे. महाविकास आघाडी समर्थक नेहमीप्रमाणे समीर वानखेडेंना 'महाराष्ट्रद्रोही' म्हणत असतीलच. पण समीर वानखेडे हे कोकणी मुस्लिम आहेत असे पुढे आले आहे. आता त्यांना विरोध केला म्हणून विरोध करणारे अल्पसंख्यांकांचे विरोधी असे का म्हणू नये? हे मी म्हणत नाहीये पण कोणत्याही प्रकरणात अल्पसंख्यांक व्यक्तीला विरोध केला तर मग तो अल्पसंख्यांक समुदायालाच विरोध असे तारे तोडणारे लोक पुरोगामी कळपातलेच असतात. अर्थातच असे दोन्ही म्हणणे हे चुकीचे आहे. समीर वानखेडे हे कायद्याला प्रमाण मानून आपले काम निर्भिडपणे करणारे अधिकारी आहेत. त्यांना दाद दिलीच पाहिजे.