मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१

मिपावर अनेक गुणी कलाकार, छायाचित्रकार आहेत. मिपा सदस्य-स्पर्धकांना काही विषय देऊन एक त्या विषयावर काढलेल्या छायाचित्रांची एक स्पर्धा आयोजित करण्याचे ठरले आहे.

स्पर्धकांना दि ५ जुलै २०२१ पर्यंत आपली छायाचित्रे साहित्य संपादकांना व्यनिने पाठवायची आहेत. तुम्ही तुमच्या प्रवेशिका sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail डॉट com या ईमेल पत्त्यावरदेखील पाठवू शकता. काही अडचणी अथवा शंका असल्यास, इथेच प्रतिसादातून विचारल्या तरी चालतील, अथवा साहित्य संपादकांना व्यनिने विचारू शकता.

या स्पर्धेचे परिक्षण दोन प्रकाराने करावे असे ठरले. एक म्हणजे वाचकांची पसंती आणि दुसरे म्हणजे या क्षेत्रातल्या जाणकार व्यक्तींची पसंती.

प्रसिध्द झालेल्या छायाचित्रांना सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय प्रकाशित केला जाईल. मिपा सदस्य दि. १५ जुलै २०२१ पर्यंत या छायचित्रांवर मतदान करु शकतील. प्रत्येक सदस्याला एका विषयाच्या धाग्यावर एकदाच मतदान करता येइल. जर दोन किंवा अधिक वेळा मतदान केले तरी पहिले मतच गृहित धरले जाइल व बाकीची मते बाद समजली जातील.

या सर्व प्रसिध्द झालेल्या छायाचित्रांचे परिक्षण या विषयातील जाणकार मंडळी स्वतंत्रपणे करतील. त्यांच्या मते जी छायाचित्रे कलात्मक व तांत्रिक दृष्ट्या सरस अशी छायाचित्रे निवडतील. त्यांचा निकाल प्रसिध्द करताना अर्थात त्यांनी निवडलेल्या छायाचित्रांचे रसग्रहणही निकाला सोबत प्रसिध्द होईल.

या समिती मधे खालील मिपाकर असणार आहेत.

१. जयंत कुलकर्णी
२. किल्लेदार
३. स्पा
४. MipaPremiYogesh

या स्पर्धे करता छायाचित्र पाठवण्यासाठी विषय आहेत
१. लॉकडाउन
२. निसर्गचित्रे
३. मुक्त विभाग (या विभागाला विषयाचे कोणतेही बंधन नसेल)

स्पर्धेचा अंतिम निकाल दि ३१ जुलै २०२१ रोजी प्रसिध्द केला जाईल

स्पर्धेचे अन्य नियमः

१) प्रत्येकजण एका विषयासाठी फक्त एकच चित्र पाठवू शकतो. अर्थात ते छायाचित्र स्पर्धकाने स्वत: काढलेले असावे व या पूर्वी कोठेही प्रसिध्द केलेले नसावे.

२) छायाचित्र पाठवताना ते कोणत्या विभागासाठी पाठवले आहे ते व्यनिच्या विषयात लिहावे. जर विषयाचा उल्लेख नसेल तर अशी छायाचित्रे मुक्त विभागात प्रसिध्द केली जातील.

३) सर्व सदस्य मतदान करणार असल्याने संपादकही सदस्य म्हणून स्पर्धेत भाग घेऊ शकतात.

४) छायाचित्राचा exif data शक्यतो असावा.

५) ह्या शिवाय छायाचित्र कुठे काढलेले आहे, आदि माहिती चित्रासोबत शक्यतो द्यावी.

६) प्रोसेसिंग वैगरे केले आहे का याची माहिती द्यावी.

७) एकदा सादर केलेले छायाचित्र कोणत्याही कारणासाठी बदलता येणार नाही.

८) मते देताना कृपया 'सेल्फी' देऊ नयेत ही विनंती. स्पर्धक हे मतदार असल्याने टेक्निकली असे करणे चूक नाही. पण इतरांचाही विचार व्हावा.

९) सर्व छायाचित्रे प्रसिध्द होई पर्यंत स्पर्धेचे धागे वाचनमात्र ठेवले जातील. मिपा सदस्य दि ५ जुलै २०२१ ते १५ जुलै २०२१ च्या दरम्यान मतदान करु शकतील.

१०) जर कोणाला आपली छायाचित्रे स्पर्धेत पाठवायची नसतील, पण ती या निमित्ताने प्रसिद्ध करायची असतील त्यांच्या साठी "मिपा छायाचित्रण कला स्पर्धे करता नाही" असा वेगळा धागा काढण्यात येईल. आपण आपली छायाचित्रे या धाग्यावर प्रकाशीत करु शकाल. हा धागा वाचनमात्र नसेल.

स्पर्धेत जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्यास हातभार लावावा ही विनंती. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!