खरतर उन्हाळा संपत आलाय पण सध्या हापूस ऐवजी इतर प्रकारच्या आंब्यांचा सिझन सुरू झाला आहे म्हणून ही झटपट होणारी आणि जराशी वेगळी म्हणून टाकतोय
मी ह्यात तोतापुरी, केसर आणि मालगोवा (मालगोबा) ,आंबे वापरले आहेत, ह्याने जरा वेगळी चव येते
अननसाच्या आणि आंब्याच्या फोडी करायच्या (सालं काढून). २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, १ टोमॅटो, बिया काढून त्याच्या फोडी आंब्याच्या फोडींच्या साईज प्रमाणे कापून, एक मध्यम कांदा चिरून.(मी थोडीशी कैरी पण बारीक चिरून घेतली, जरा दाताखाली आली की छान लागते).
हे सगळं मिक्स करून घ्यायचे, बारीक कोथिंबीर चिरून वरून भुरभुरायची. हे जरासं गार खायला मला आवडते म्हणून फ्रीज मध्ये ठेवायचे.
टीप:- पाणी सुटू नये म्हणून अगदी ऐन वेळेस ह्यात काळ मीठ आणि थोडासा लिंबाचा रस घालायचा.
हा सालसा नुसताच खाल्ला तरी हरकत नाही, किंवा मग नाचो चिप्स सोबत डिप म्हणून.
एक पापड मस्तं तळुन त्यावर हे टाकून एक वेगळा मसाला पापड पण पुढल्या वेळी तुमच्या चकण्याला होईल!