बर्याच दिवसाने आज आले आणि पाहिले की, इथे आपले युट्युबचे काम प्रमोट करु शकतो( हा माझा अजूनही अंदाजच आहे पण वाटले की, अश्या प्रमोशनला बंदी नसावी.) जर असलीच तर मी हा लेख काढून टाकेन, अॅडमिन कृपया मला तसे कळवा.
खरे तर मी काही व्यवसायिक युट्युबर नाही आहे, म्हणजे पुर्णपणे छंद म्हणून काढलेला प्रयत्न होता. तो सुद्धा माझ्या आईसाठी.
गणपतीत तिच्या खुपच मागे लागले की, तु तुझ्या पाककृती टाक म्हणून. कारणही तसेच होते.
आई एकदमच एकाकी झाली होती एका धक्क्याने. तिला पुन्हा कशात तरी गुंतवावे म्हणून माझ्याकडे आणले व आग्रह केला. तिचा पुर्ण नकार होता.
मग म्हटले मी करेन, तु सांगत जा.
पण गणपतीत तीनच विडिओ केले आणि बंद झाला कारभार.
पारंपारिक मोदक कृती अथपासून इतिपर्यंत : मोदकाचे पीठ कसे करावे, उकड कशी करावे, मोदक वळावे कसे वगैरे
१) पारंपारिक मोदक
पारंपारिक नेवरी
२) नेवरी
तळणीचे मोदक
३) मैदा न वापरता तळणीचे मोदक
पुन्हा नवीन वर्षाला सुरुवात करायची ठरले व तिला म्हटले तू कॅमेरा समोर ये व तुझा आवाज दे, पण परत तिचा नकार.
आणि आज सहजच मनात आले की, इथे कदाचित प्रोत्साहन मिळु शकते. तिला आज परत आग्रह केला. बघुया काय म्हणतेय ती...
तोवर तिच्या कृतीचे , मी करून दाखवलेले विडिओ देत आहे.
आईने साथ दिली तर, विडिओ टाकायचे ठरलेय... पण बघुया कसा प्रवास पुन्हा सुरु होतोय....
तुम्हाला आवडले तर, नक्कीच तिला सांगून नवीन विडिओ टाकेन...
धन्यवाद.