अमूर फाल्कन उर्फ ससाणा - दिल आणि गर्दी खेचक पक्षी

Amur F

Amur M

Lesser K

Indian Roller

नोव्हेंबर म्हटले कि आमच्या सारखे पक्षी निरीक्षक आणि फोटोग्राफर्स स्थलांतरित पक्ष्यांची वाट बघायला लागतात. अशातच नोव्हेंबर मध्ये बातमी आली कि अमूर फाल्कन दिसायला लागलाय. ९ महिने झाले मी फोटोग्राफी आणि पक्षी निरीक्षणाला गेलो नव्हतो एक प्रकारचं नैराश्यदायक वातावरण होतं .
मग काय खडाक्टिंग केले आणि शोधात निघालो. पण आम्हाला त्या दिवशी दिसला नाही. तसा मी ८ एक वर्षांपूर्वी ह्याच ठिकाणी पाहिला होता पण तेंव्हा कॅमेरा नव्हता आणि नंतर एकदा दुसरी कडे पाहिला होता तेंव्हा कॅमेरा होता पण पक्षी तारेवर बसला होता. मग हे न विसरणारं वर्ष संपता संपता परत कळाले कि अमूर दिसायला लागले आहे. आता मात्र पूर्ण तयारीनिशी निघालो आणि दुपारी ३ च्या सुमारास पोहोचलो...आणि जेंव्हा अमूर ला पाहिलं तेंव्हा अक्षरशः धन्य झालो. ह्या पक्षाला आजूबाजूचं काहीच भान नव्हतं, इतके लोकं त्याला बघत होते, फोटो काढत होते आणि त्याचे आपलं खाण्याचं काम चालू होतं . तो दिवस संपला पण मन नाही भरलं . २ दिवसांनी परत त्याला आणि इतर पक्षी बघायला गेलो. एकतर हॅबिटॅट इतके सुंदर झाले आहे..सगळी कडे जांभळी मंजिरी ची फुलं आहेत , हिरवाई आहे..ह्या वेळेस आम्ही सकाळी ७.३० ला पोहोचलो. हळू हळू लोकांची गर्दी व्हायला लागली. गेल्या गेल्या आम्हाला फिमेल पक्षी दिसला मस्त पैकी अळ्यांवर, किड्यांवर ताव मारणे चालू होते. मग आम्ही अजून पुढे गेलो , मेल पक्षी नेहेमीच्या क्षेत्रात नव्हता . आम्ही अजून पुढे गेलो आणि तिकडे तो मस्त पैकी आरामात बसलेला दिसला . आम्ही शांतपणे गाडीतून उतरून झोपत झोपत थोडे पुढे जाऊन फोटो काढले आणि पुढे गेलो. एका ठिकाणी उभं राहून न्याहारी उरकली आणि परत इतर पक्षाच्या शोधात निघालो. दूरवर कापशी घार मस्त पैकी भक्ष्याच्या शोधात आकाशात हॉवर करत होती. थोडे फोटो आणि विडिओ काढून पुढे गेलो तर अजून एक सुंदर असा लेसर केस्ट्रेल नावाचा पक्षी (मेल) उन्ह खात बसलेला दिसला. शांतपणे अँप्रोच केले आणि फोटो काढले. तेवढ्यात इतर गाड्या आल्या आणि तो उडून गेला. पुढचे २-३ तास हा हवेतच उडत होता. फिरत असतांना थोड्यावेळाने परत हा पक्षी दिसला आणि ह्यावेळेस फोटो काढत असतांना लक्षात आले कि तो साप खातो आहे. हा पक्षी साप खातो पण असं दिसणे म्हणजे एक अद्भुत अनुभव होता. अक्षरशः १ मिनिट मध्ये त्याने साप पकडला आणि ५ मिनिट्स मध्ये संपवला.
आम्ही परत अमूर च्या इकडे आलो. तेंव्हा फिमेल अमूर पक्षी मस्त पैकी जांभळ्या मंजिरीच्या फुलांमध्ये बसलेली होती. इतकी सुंदर फ्रेम होती कि बस्स. तशाच वातावरणात लांब आम्हाला इतर काही पक्षी पण दिसले जसे कि आयबीस, बगळे , खंड्या , लार्क , नीलकंठ , ब्राह्मणी घार वगैरे. संध्याकाळ व्हायला आली तसे आम्ही आता एका पक्षाची वाट बघत उभे राहिलो. हा पण युरोपातून येणारा पक्षी आहे sparrohawk "चिमणबाज" . तो आला आणि अक्षरशः ५ मिनिट्स मध्ये परत उडून गेला..
आता तुम्ही म्हणाल अमूर ससाण्याची एवढी काय क्रेझ तर ऐका . हा पक्षी साधारण पणे २२, ००० किमी अंतर पार करतो स्थलांतराच्या काळात . म्हणजे रशियात असलेल्या अमूर नदीच्या खोऱ्यातून निघून, मंगोलिया , चीन मार्गे नागालँड इथे भारतात येतो. नागालँड च्या इथे हजारोंच्या संख्येने येतात. साधारण २०१२ पर्यंत त्यांची खूप शिकार व्हायची खूप म्हणजे दिवसाला ३ ते ५००० वगैरे. मग अचानक सगळी सूत्र फिरवली गेली आणि नागालँड मधल्या लोकांना शिक्षण दिले गेले आणि त्यांना शिकारी पासून परावृत्त केले गेले. सध्या तिकडे एक पण शिकार होत नाही .
तर पुढे हा पक्षी हळू हळू भारतात पुढे पुढे येत राहतो. पुण्यात दर वर्षी येतो बऱ्याच ठिकाणी दिसतो. आणि मग २-३ आठवड्यांनी केरळ कडे जातो. तिथे परत काही दिवस मुक्काम करतो आणि मग निघतो विना थांबा प्रवासाला . पूर्ण अरबी समुद्र पार करतो (४००० किमी) आणि आफ्रिकेमध्ये स्थिरावतो . तिकडे ३-४ महिने राहून परत रिटर्न जातो. जातांना तो अफगाणिस्तान वगैरे मार्गाने अमूर च्या नदीच्या खोऱ्यात येतो. आहे कि नाही जोरदार पक्षी :).
lockdown नंतरचं एकूणच निराशाजनक वातावरण जाऊन एकदम पॉसिटीव्ह वातावरण निर्माण झाले हे नक्की
~ योगेश पुराणिक, जाने २०२१