चुलीवर आपण जेंव्हा काही ऍन बनवतो तेंव्हा लाकडाच्या धुराचा वास त्या अन्नात आपसूक घुसतो. आधुनिक मुलांना कदाचित हा वास आवडणार नाही पण गावांतून शहरांत गेलेल्या अनेक लोकांना हा वास मिस होतो. मक्याचे कणीस, पापड किंवा अगदी "नुस्तें" जरी गॅस वर बनवले तरी त्या लाकडाच्या धुराच्या वासाच्या शिवाय त्याची चव तेव्हडी चांगली वाटत नाही. ह्या शिवाय बिर्याणी, मटण, जंगली गेम मांस ह्याला जर तो थोडा धुराचा वास नाही तर त्याला अजिबात मजा येत नाही.
त्यामुळे खालील ट्रिक वापरून आपण अगदी फ्लॅट मध्ये सुद्धा लाकडी धुराच्या वासाचे अन्न बनवू शकता.
सर्वप्रथम एक कोळसा घ्यावा (चार-कोल), कधी गावांत गेला असला तर साधा लाकडी कोळसा सुद्धा चालेल पण हा अतिशय ड्राय असला पाहिजे.
जे काही अन्न बनवायचे असेल, बिर्यानी वगैरे ते बनवावे. मग एका वाटींत शुद्ध घी मेल्ट करून ठेवावे. बटर वगैरे चालणार नाही चांगले घी च पाहिजे. मग कोळसा गॅस वर चांगला लाल करावा. मग ती घी असलेली वाटी आपल्या पदार्थांत ठेवावी आणि कोळसा त्यांत टाकून झटपट आपले भांडे झाकावे. घी जळून एक पंधरा शुभ्र धूर अप्लाय भांड्यांत पसरेल. एक १० मिनिटे जर भांडे झाकून ठेवले तर तो धूर अन्नात चांगला मिक्स होतो.
प्रत्येक धूर वेगळा असतो घी आणि कोळसा जळून निर्माण होणारा धूर थोडा यज्ञाच्या धुराच्या प्रमाणे असतो. पण तुम्हाला जर वेग वेगळा धूर हवा असेल तर मक्याच्या कणसाला जे केस सदृश्य घडे असतात ते जाळून सुद्धा येणार धूर चांगला असतो. त्याशिवाय नारळाच्या "कट्टी" चा धूर, "सोन्ना" चा धूर आणि "पिड्या" चा धूर सुद्धा वेगवेगळा असून त्याची चव वेगळी असते.
माशांना थोडा समुद्री धूर द्यायचा असेल तर थोडी रेती वाटींत ठेवावी आणि त्यांत खारे पाणी ठेवावे. मग हि वाटी मायक्रो वेव्ह मध्ये गरम करून नंतर अन्नात ठेवली तरी चालेल.
विविध प्रयोग करून पहा. ज्यांना हि ट्रिक ठाऊक नसते असे लोक अगदी थक्क होतात.