मागील दोन्ही पाकृ नॉन-व्हेज होत्या, म्हणून खास, पनीर प्रेमींसाठी.. सोप्पा आणि झटपट होणार पदार्थ
साहित्य:
- मल्टि ग्रेन / गव्हाचे पीठ - १ १/२ कप
- मीठ
- तेल
पनीरचे सारण:
- पनीर - २०० ग्रॅम्स
- कांदा - १ मध्यम आकाराचा बारीक चिरून
- हिरवी मिरची - १ बारीक चिरून
- पुदीना पाने - १२ ते १५ बारीक चिरून
- कोथंबीर - १/२ कप बारीक चिरून
- आले-लसूण पेस्ट - २ टिस्पून
- ओवा - १/२ टिस्पून
- धणे पावडर - १ टेबलस्पून
- काळी मिरी पावडर - १ टिस्पून
- लाल तिखट - १ टिस्पून
- अमचूर पावडर - १ टिस्पून (ऐच्छिक)
- कसुरी मेथी - २ टिस्पून
- मीठ - चवीनुसार
- तूप
पाककृती:
- एका भांड्यात गव्हाचे पीठ, तेल, मीठ आणि पाणी एकत्र करून पीठ चांगले मळून घ्या आणि १५ मिनिटे झाकून ठेवा.
- पनीरचे तुकडे करून १० मिनिटे थोड्या पाण्यात घालून ठेवा.
- पनीर पाण्यातून पिळून घेऊन एका भांड्यात छान चुरून घ्या.
- त्यामध्ये वरील सर्व साहित्य एकत्र करून सारण बनवून घ्या.
- कणिक थोडी मळून, कणकेचे समान आकाराचे गोळे करून त्याची पोळी थापून अथवा लाटून घ्या.
- त्यावर पराठ्यात मावेल एव्हढं सारण घाला.
- वरून अजून एक लाटलेली पोळी ठेऊन कडा घट्ट दाबून घ्या.
- तवा गरम करून त्यावर काही तेलाचे थेंब टाकून टिश्यू पेपर किंवा कापडाने पुसून टाका.
- गरम तव्यावर लाटलेला पराठा घाला आणि कडेने थोडे तेल / तूप सोडा. एका बाजूने भाजून झाला कि पराठा परता आणि सोनेरी होईपर्यंत दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.
- गरम पनीर पराठे दही/ राईत्या सोबत सर्व्ह करा.