लागणारे जिन्नस:
- मटण - १/२ किलो
- बासमती तांदूळ - ४०० ग्रॅम
- जिरे पावडर - १ टीस्पून
- धणे पावडर - २ टीस्पून
- लाल तिखट - २ टीस्पून
- दालचिनीच्या काड्या - ४
- काळी मिरी - १ टीस्पून
- तमालपत्र - २
- मसाला वेलची - १
- चक्रफुल - १
- दगडफूल - १ चिमूट
- लवंग - ६ ते ८
- वेलची - १० ते १२
- कांदे - ४
- तेल - ४ टेबलस्पून
- आलं लसूण पेस्ट - १ टेबलस्पून
- दही - २ टेबलस्पून
- पुदिना पानं - १/२ कप
- कोथंबीर - १/२ कप
- हिरवी मिरची - ३ ते ४
- कोमट दूध - १/२ कप
- केशर - १/२ टीस्पून
- लिंबाची फोड - १
- गहू पीठ १/५ कप
- मीठ
क्रमवार पाककृती:
१. मटण चांगले धुऊन घ्या आणि मॅरिनेशन साठी त्यामध्ये मीठ, जिरेपूड, धणेपूड, लाल तिखट, अख्खे मसाले, शेंगदाणा तेल, हिरवी मिरची आणि आल-लसूण पेस्ट घाला.
२. नंतर दही घाला.
३. मॅरिनेशन मटणाला चांगले चोळून घ्या आणि झाकून ठेवा. कमीत कमी ३ ते 4 तास किंवा रात्रभर फ्रिज मध्ये ठेऊन द्या. या पद्धतीमुळे मटण नरम होईल आणि लवकर शिजेल. जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले असेल तर इतर तयारी सुरू करण्यापूर्वी ते फ्रिज मधून काढून बाहेर ठेवा कारण गॅस वर चढवण्या आधी ते रूम टेम्परेचरला येणे आवश्यक आहे.
४. कांदे बारीक चिरून घेऊन ते मोकळे करा आणि गोल्डन ब्राऊन व कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्या.
५. कोथिंबीर आणि पुदीना पाने धुऊन छान कोरडी करून मग जाडसर चिरून घ्या.
६. मॅरीनेट केलेल्या मटनामध्ये १/२ तळलेले कांदे आणि १/३ चिरलेली पाने घाला.
७. केसर कोमट दुधात भिजवा आणि बाजूला ठेवा.
८. बासमती तांदूळ २ वेळा धुवा आणि ३० मिनिटे पाण्यात भिजवत ठेवा.
९. पीठ भिजवा आणि बाजूला ठेवा.
१०. भात करण्यासाठी पाणी उकळत ठेवा. त्यात मीठ, अख्खे मसाले, चिरलेला १/३ पुदीना आणि १/३ कोथिंबीर, लिंबाची फोड आणि थोडे तेल घाला.
११. उकळत्या पाण्यात तांदूळ घाला आणि भात ८०% पर्यंत शिजवा.
१२.जाड बुडाच्या पॅन मध्ये किंवा प्रेशर कुकरमध्ये सगळं मटण तळाशी घाला.
१३. भात गाळून घ्या.
१४. गाळलेला भात गरम असताना लगेचच मटणावर पसरवून टाका.
१५. भातावर आणि सर्व बाजूने तूप घालून घ्या.
१६. शिल्लक राहिलेले पुदिना आणि कोथंबीर पाने घाला.
१६. केशर भिजवलेले दूध घाला.
१७. तळलेले कांदे घाला
२०. भिजवलेली कणिक लावून भांड्याचे झाकण घट्ट बंद करा जेणेकरून वाफ जराही बाहेर जाता नये.
२१. प्रथम मोठ्या आचेवर ५ ते १० मिनिटे ठेवा.
२२. त्यानंतर आच कमी करा आणि मंद आचेवर ४० ते ४५ मिनिटं बिर्याणी दम होण्यासाठी ठेवून द्या किंवा तवा गरम करून त्यावरही हे पॅन ४० ते ४५ मिनिटांसाठी दम साठी ठेवून द्या.