body {background-image: url("https://i.postimg.cc/JhGSHjSZ/rsz-1lights-new.jpg");}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding-bottom:16px;background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");}
#borderimg {
border: 10px solid transparent;
padding: 15px;
border-image: url(https://i.postimg.cc/GhRwyFRv/border.png) 30 stretch;
}
.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}
असोशी:

दुपारचे चार वाजत आले. अन्वी उठलीच. तनीष ला भेटायला जायचं आहे ना, मग? आज खूप दिवसांनी ते दोघे भेटणार होते. जवळपास आठवडा. दोन प्रेमी जीवांना भेटण्यासाठी हा काळ सुद्धा अतीच होता.
पटकन अन्वी तयार झाली. त्याला आवडणारा तिचा मोतिया रंगाचा टॉप आणि ब्लॅक जीन्स. ठरलं. भराभर तयार होताना तिच्या मनात आपोआपच तनीष चेच विचार होते. आपल्याला आवडत्या ड्रेस मध्ये पाहून तो किती खुश होतो ते तिला छानच माहीत होते. तिला या ड्रेस मध्ये पाहिलं की त्याचे डोळेच चमकायचे. हळूच एक शिट्टी आणि छान हसणं हे आताही तिला आठवत होत. अन्वी होतीही सुरेख. उंचीपुरी. केतकीसारखाच सुंदर तेजाळ रंग, थोडसं अपरं नाक, नाजुक जिवणी, मोठाले काळेभोर सुंदर डोळे जे कायम पुढच्याला घायाळ करणारच. आणि हे कमी म्हणून की काय दोन्ही गालांना जीवघेण्या खळ्या. शिवाय मुलगी हुशार, मोठ्या घरातली. म्हणजे कशात काही कमी नाहीच. शिवाय वागणं ही छान. शेवटी आबासाहेबांची एकुलती लाडकी लेक. त्यांच्या शब्दाबाहेर काहीच न करणारी. याचा आबासाहेबांनाही विलक्षण अभिमानच.
अन्वी ने सगळ्यात शेवटी एक मस्त स्कार्फ घेऊन तो डोक्याला आणि मानेला अगदी स्टाइल मध्ये गुंडाळला. अगदी थोड्याच वेळात ती नेहमीच्या त्यांच्या भेटायच्या ठिकाणी म्हणजे गावाबाहेर च्या एका झाडाखाली पोचली. नेहमीप्रमाणेच तनीष होताच तिथे. तिला आवडणार्या मस्त जीन्स आणि पांढर्याशुभ्र टी शर्ट मध्ये. तोही दिसायला सुरेखच, त्यात पंजाबी. फ्रेंच कट दाढी, कुरळे भरपूर केस आणि अगदी स्वप्नाळू डोळे. अस्सल चित्रकार. तिला पाहिल्या पाहिल्या एक शीळ गेलीच त्याच्या ओठातून. तिने “काय रे तुझ अस नेहमीचच” असं म्हणून लटक्या रागाने पाहिलं त्याच्याकडे. तो अगदी अनिमिष नेत्रांनी पहात होता तिच्याकडे. “अगदी तुला समोर बसवून पोर्ट्रेट ला सुरुवात करावी असं वाटतय.” तनीष म्हणाला.
“पुरे की. किती काढणारेस माझीच चित्रे? 2 प्रदर्शने झाली त्यात मी आणि मीच. किती चिडवलं मला मैत्रिणींनी...” अन्वी म्हणाली.
“Hmm. आपण इतकं सुंदर दिसायचं, मग पुढचा तरी काय करणार ना?” तनीष म्हणाला.
नेहमीसारखेच दोघे एकमेकांच्या बाहुपाशात विसावले गप्पा मारताना. तनीष म्हणाला “ पहिल्यांदा आपण माझ्या एका exhibition ला भेटलो, तिथे तू मैत्रिणींबरोबर माझ्या चित्रांबद्दल बोलत होतीस. तुझी चित्रांबद्दलची सखोल समज वगैरे नंतरचा विषय. पण आधी तर love at first sight च होतं. तुफानी आवडलीस मला तू. तुझं ते संसर्गजन्य हसणं तर भन्नाट. तुझं ते खळाळणारं हसू सगळ्या ग्रूप मध्ये पसरायचं. हेवा वाटला मला चक्क हे पाहून. मग ताबडतोब ओळख काढून तुझ्या मागेच लागलो, नाही का ग मी?”
अन्वी हसली. म्हणाली- “तर तर.. त्याबाबतीत एकदमच पंजाबी खाक्या तुझा.आवडला तर मलाही होतासच की. पण मी नसता पुढाकार घेतला कदाचित.”
तनीष बोललाच “hmm, आबासाहेब आणि त्यांचं खानदान, त्यांची इज्जत, त्यांचे मानापमान, त्यांचा अहंकार. सबकुछ आबासाहेब. नाही? त्यात मी तुझीच चित्रं काढायला लागलो. मग तर काय, निमित्तच त्यांना. आणि त्यात प्रेमात पडलो आपण.”
तो दुखावलेला अन्वी ला कळतच होतं. “नको ना त्या आठवणी तनीष. आपलं काय ठरलं आहे? भेटायचं ते आनंदासाठी. हो ना?”
तनीष म्हणाला “ हो, आनंदात, आनंदासाठी भेटायचं हे कबूलच. पण हा विषय निघाला की मी अगदी ढवळून निघतो ग आतून. मी महाराष्ट्रियन नाही, पंजाबी आहे, हा दोष कसा? माझी कला पंजाबी आहे की काय फक्त? सगळ्यांना आनंदच देते ना ती? माझं घराणं कदाचित तुमच्याइतक तालेवार नसेल, पैसे कदाचित तुमच्यापेक्षा कमी असतील पण तरीही आपण सुखातच राहिलो असतो ग. प्रेम करतो आपन एक्मेकांवर.. हो ना? माझ्याही मम्मी- डॅडी चं दुखणं नेमकं काय ते कळलच नाही मला. तुम्ही अनुरूप बघणार ना मुलगी/मुलगा? मग आपल्यात जात, पैसा हे सोडलं तर कमी तरी काय आहे? म्हणजे आपलं सुख कशात; हे कायम दुसरे- भले ते पालक का असेनात- तेच ठरवणार. बरं, आपण उच्चशिक्षित सगळे. मग बसून बोलता नसतं आलं? हे काय होऊन बसलंय कोण जाणे. ते असूदे, तुला कुणी पाहिलं नाही ना इकडे येताना? तुला काही झालं तर मी सहन नाही करू शकणार. मलाही फक्त तूच पाहते आहेस हे माझं नशीब.”
अन्वी म्हणाली- “ नाही रे, कुणीही पाहिलं नाहीये मला. उगीच काळजी करू नकोस. आज मस्त गप्पा मारूया आपण. मनसोक्त.”
तनीष म्हणाला- “ कया बात है !! आज कशी काय असं बोलते आहेस? बर, तो स्कार्फ तरी काढ की डोक्यावरचा. अगदी घूंघट घेतल्यासारखं काय?”
अन्वी-“ असू देत रे. तू बोलत रहा फक्त.”
तनीष –“ तो स्कार्फ काढ आधी. इथे कुणी नाहीये तुला ओळखायला. थांब, मीच काढतो.”
अन्वी – “ नको रे.. आणि अजून तुझ्या हाताच्या जखमा बर्या नाही झाल्या?
तनीष-“ त्या? त्या कशा बर्या होतील? अन्वी, तुझ्या आबासाहेबांनी आणि त्यांच्या लोकांनी माझे कुर्हाडीने किती किती तुकडे केले गं, आणि त्या दरीत दिलेत टाकून. तुझ्यात जीव अडकलाय त्यामुळे तुझ्यासाठी असाच एकत्र होऊन येतो मी तुला भेटायला.”
अन्वी-“ तनीष, नको रे त्याची आठवण. मला हे कळल्यावर मी काही करू नये म्हणून मलाही काय जबर मारहाण केली होती, उपाशी ठेवलं होतं. तुझं काय झालं हे मला तूच तर येऊन सांगितलस. आणि मग तू मला एकटीलाच दिसतोस हे कळल्यावर मीही क्लास वगैरेची कारणं देऊन तुला भेटायला येतेय हल्ली.”
तनीष- “ अगं पण अन्वी, या नात्याला काहीच अर्थ नाही ना.. आज नाही उद्या तुझ लग्न आबासाहेब सांगतील तिथे होईलच की. सुखात रहा तू, हेच सांगायला आज बोलावलं मी तुला.पण तू आलीस की हे बोलवत नाही मला. तू लांब जातानाही माझं सर्वस्व गमावल्यासारखं वाटतं मला. बरं, ते जाऊदेत.. खूप उशीर झालाय. जा तू आता. उगीच त्यावरून आणखी काही नको गं व्हायला”
अन्वी- “ तनीष, तन्या - वेडा आहेस तू. प्रेमाची असोशी फक्त तुलाच आहे की काय? हे पहा माझ्याकडे. तुला मी स्कार्फ काढायला हवा होता ना? काढला पहा.”
तनीष- “ अन्वी, तुझ्या कानावर ही भळभळती जखम? कसली? तू काही बोलली नाहीस?”
अन्वी: “ अरे, सांगणारच होते. गेल्या 5-6 दिवसात पक्का झाला माझा प्लान. आई-आबा सगळ्यांशी खूप छान वागायला सुरुवात केली होती मी. तुला बोललेच होते. त्यामुळे सगळेच थोडे गाफिल होते. मग आज दुपारी आबांच पिस्तूल घेतलं, त्यांच्या नकळत. तुझ्याकडे तर यायचं होतच. मग वेळ कशाला घालवायचा? एक खटका ओढला. बास. पुरतोच तो. त्यामुळे आता काही जायचं नाहीये घरी मला. बस. आता माझे किती तुकडे करायचेत ते करूदेत तिकडे त्यांना.
तू मिले, दिल खिले, और जीने (?) को कया चाहीये? हो ना?”