तळणीचे मोदक - मैदा न वापरता

तळणीचे मोदक, कोकण सोडून इतर भागात ज्यास्त करतात. कोकणात करतच नाही असे नाही पण, तांदूळ मुबलक प्रमाणात असल्याने तांदूळाचे उकडीचे मोदक करतात.

पण आजकाल, असा प्रश्ण नाही, ज्याला जे आवडेल, जमेल तसे त्याने करावे.

बहुतेकदा, मैदा वापरूनच करतात. पण मैदा प्रकृतीला चांगला नाही, तेव्ह हि कृती मी माझ्या, आईची मैद्याशिवाय मोदक कसे करावे ती देत आहे.

१ वाटी रवा,
१/२ वाटी कणीक,
१ टेबलस्पून तांदूळाचे पीठ. होय. ह्या पीठाने मस्त खुसखुशीतपणा येतो.
दुसरं म्हणजे, तेलात न तळणे हि एक खासियत आहे. तेल पित नाहित.
रवा छान मळला की, मोदक छान क्रिस्पी रहातात तर कणीकेने अतिशय कडक होत नाहीत.

सारण हे नेहमीच्याच पद्धतीने करायचे आहे.

पीठ मात्र सगळी नीट कालवून घ्यावी.

पुर्ण रेसीपी नीट समजायला, तळणीचे मोदक इथे बघाल तर कळेल....