बुंदीचे लाडू ....

बुंदीचे लाडू हा आमचा आवडीचा लहानपणापासूनचा सवंगडी :)
सध्या कोरोनामुळे बाहेरच खाण टाळत रक्षाबंधनासाठी घरीच लाडू केले . लहानपणी जवळ जवळ बऱ्याच लग्नात बुंदी किंवा बुंदीचे लाडू सगळ्यांच्याच खाण्यात आले असतीलच, आताशी लग्ना मध्ये वेगवेगळ्या मेनुच्या गर्दीत बुंदी न बुंदीचे लाडू जणू हद्दपारच झालेत असो .
हे लाडू मी न आईने मिळून बनवले , एकाला दोघे असतील तर काम सोप्प होत न शक्यतो बिघडत नाही
आम्हाला घाई असल्याने लाडू गरम गरम वळले त्यामुळे आकार गोल गरगरीत नाही आला त्याबद्दल क्षमस्व !
तुम्ही निवांत करा घाई गडबडीत करायचा प्रकार नाही हा :)
साहित्य :
१) दीड कप बेसन
२) चिमुटभर खाता सोडा
३) तळण्यासाठी तेल
४) घरातला तळणीचा झारा / गोल किसणी /बुंदीचा झारा

कृती : बेसन पाण्यात कालवून घ्यावे , गुठळी राहता कामा नये आणि मिश्रण चमचाने खाली सोडले कि टपटप थेंबासारखे खाली पडेल इतके पातळ ठेवा छान एकजीव फेटून झाले कि चिमूटभर सोडा घालून पुन्हा एकदा फेटून घ्या त्यामुळे मिश्रण हलकं होत.
एकीकडे तळणासाठी एखाद्या पसरट भांड्यात किंवा मोठ्या कढईत तेल गरम करा गॅस फ्लेम शक्यतो हाई असावी ,गरम झालेल्या तेलातले २ चमचे तेल मिश्रणात टाका न हलवून घ्या याने बुंदी क्रिस्पी होते
आता झारा शक्यतो अर्धा फूट उंचीवर ठेवून त्यात चमचाने मिश्रण घालत झारा पूर्ण तेल भर फिरवा त्याने बुंदी सुटसुटीत होते एका जागी मिश्रण जास्त पडलं तर मोठे गोळे तयार होतील अशी सर्व बुंदी तळून ताटात काढून घ्या
(तुम्हाला जर कलर हवा असेल तर वरील मिश्रण वाट्यामध्ये काढून त्यात खाण्याचा कलर घालून तळून घेणे )

आता पाक बनवूया
त्यासाठी दीड वाटी साखरेत एक वाटी पाणी घालून उकळत ठेवावे आपल्याला एक तारी किंवा दोन तारी पाक नाही करायचा फक्त पाक मधासारखा थोडा चिकट वाटला कि गॅस बंद करावा

आता गरम पाकात बुंदी घालून २ मिनिट झाकण लावून गॅस वर एक वाफ काढा याने बुंदी पाक छान शोषून घेते
आता मिश्रण छान मिक्स करून त्यात पिस्ते ,मनुके , बदाम काप,घाला (हे कम्पलसरी नाही )
आणि मिश्रण कोमट झाले किती हाताला तेल किंवा तूप लावून लाडू वळून घ्या
नुसती बुंदी पण लै भारी लागते तशी पण खाऊ शकता
A
B
C
E
G