राम राम मंडळी ,कसे आहात ?
मला यु ट्यूब वर नवनवीन रेसेपी पहायला न करून पाहायला पण आवडतात , असाच एकदा " राजस्थानी घेवर ची रेसेपी नजरेखालून गेली प्रकरण इंटरेस्टिंग वाटलं कारण हा पदार्थ मीच काय माझया घरच्यांनी हि पाहिला नाही खाणे तर लांबच म्हणून म्हणलं करून तर बघू अजून ३,४ व्हिडीओ बघितले तर काही जणांनी त्याला इतकं कठीण करून सांगितलं कि ,हिमालय चढणे सोप्प वाटू लागलं एक बया तर म्हणाली " भगवान ने चाहा तो आपके घेवर अच्छे बनेंगे और घेवर फ्राय करते सावधानी बरते नही तो आग लग सकती है , इतकं सगळं घाबरवल्यावर कुणाची हिम्मत होईल घेवर बनवायची ?म्हणून त्यावर घालण्यासाठी केलेली रबडी आम्ही बापड्यानी तशीच खाऊन टाकली , पण मन मानेना वाटलं बघू एक ट्राय मारून जे होईल ते होईल ,
खर सांगते लोकांनी या रेसिपीचा मोट्ठा बाऊ करून ठेवलाय , डोकं शांत ठेवून केलं ना तर लय भारी होतंय बघा !
पारंपरिक कृतीला फाटा देऊन इन्स्टंट मिश्रण तयार करता येत आणि आउटपुट तितकाच लाजवाब आहे
खाली दिलेलं हे प्रमाण माझया सारख्या नवशिक्या ना एकदम हिट झालं बघा
साहित्य :
१) मैदा - १ वाटी
२) तूप - २ चमचे ( मी साजूक घेतलय, नसेल तर वनस्पती पण वापरू शकता )
३)बेसन -१ चमचा
४) अर्ध्या लिंबाचा रस (गाळून )
५) तळण्यासाठीं तेल (किंवा तूप)
६)बर्फ़ाचे क्युब्स -२ ट्रे
७) थंड दूध अर्धी वाटी ( जी वाटी मैद्याला वापराल तीच )
८) थंड पाणी ( फ्रिज वॉटर )
कृती :
ज्यात आपण पातळ वाटण करतो न ते मिक्सर च भांड घेणं ,त्यात २ चमचे तूप न ४ बर्फ़ाचे क्युब्स टाकून १०-१५ सेकंद फिरवून घेणे , त्यामुळे तूप बटर सारखं होत , आता त्यात दूध ओतून पुन्हा फिरवून घेणे ,मिश्रण क्रिमी झालं कि त्यात २ चमचे मैदा न थोडं पाणी घालून फिरवून घेणे ,मैदया मध्ये गुठळी होता कामा नये , पुन्हा २ चमचे मैदा पुन्हा थोडं पाणी असं फिरवून घेणे , असा संपूर्ण मैदा थोडं थोडं पाणी घालून फिरवून घेणे , शेवटी एक चमचा बेसन घालून पुन्हा फिरवणे सर्वात शेवटी लिंबाचा रस घालून फिरवून घेणे.
ही सर्व प्रोसेस मिक्सर सलग न चालवता चालू बंद करून करावी आता यात किती पाणी लागेल ? मला २ छोटे ग्लास लागलेत आणि मिश्रण पातळ हवं चमच्याने सोडलं कि सुरक्कन खाली आलं पाहिजे
आता हे मिश्रण एका भांड्यात ओतुन ते भांड बर्फ घातलेल्या एखाद्या परातीत किंवा पातेल्यात ठेवा मिश्रण जितकं थंड राहील घेवर तितकेच छान होतात
पुढची स्टेप थोडी काळजी पूर्वक
घेवर तळताना भांड जस असेल तशी फ्लेम ठेवा , शकयतो कमी व्यासाचे भांडे वापरणं उत्तम , माझं पातेलं छोट होत म्हणून मी मध्यम आचेवर तळल मोठं जाड बुडाचं पातेलं असेल हाय फ्लेम लागेल .
१) माझ्याकडे एक छोटी पातेली होती मी तीच वापरली या साठी लोक शक्यतो निमुळती भांडी वापरतात
२) मी पातेलीत अर्ध्या पेक्षा कमी तेल घातल याच कारण जास्त तेल घातलं तर फेस होऊन मिश्रण बाहेर येऊ शकत म्हणून प्लिज अर्ध भांड च तेल घ्या
३) तेल कडक तापले की चमच्याने अगदी थोडं मिश्रण तेलात सोडावं , मिश्रण सोडल्यावर फेस न बुडबुडे येतात म्हणून थोडं थांबावं न ते कमी झालं कि पुन्हा थोडं मिश्रण सोडावं असं करत एक वर्तुळ तयार होत , त्याच्या मध्ये चमच्याने जागा करून मधोमध मिश्रण सोडत राहावं ,हि प्रोसेस करत राहावी तुम्हाला पाहिजे तो थिकनेस आला कि सुरीने हलकेच घेवर चे काठ किनाऱ्यापासून सोडवून घ्यावेत न वरून थोडं दाब देऊन वरची बाजू तेलात बुडवून खरपूस तळून घ्यावी न मग घेवर चमच्या न सुरीच्या साहाय्याने बाहेर काढून निथळत ठेवावा कारण यांच्या जाळीमध्ये तेल असत
पाक : १ वाटी साखर घेऊन त्यात अर्धी वाटी पाणी , ह्याच उकळून मधासारखा मिश्रण झालं कि पाक रेडी
रबडी : १ लिटर दूध घेऊन मंद आचेवर आटवत राहावे , काठाचे मलाई काढून मिक्स करत राहाववी घट्ट होत आलं की त्यात आवडीनुसार साखर घालावी पुन्हा थोडं आटवून घ्यावं झाली रबडी ,
आता घेवर घेऊन त्यावर साखरेचा पाक घालावा न वरून थोडी रबडी घालावी , पिस्ते बादाम घालावेत बस्स !!!!
तुम्ही घेवर बनवून एअर टाईट कंटेनर मध्ये भरून ठऊ शकता , १५-२० दिवस सहज टिकतात जेव्हा वाटेल तेव्हा रबडी बनवून खाऊ शकता

पहिला घेवर देवाला ;)

अब देखो



