गूगल ड्राइववर अपलोड केलेले फोटो, ओडिओ, विडिओ वेबसाईटवर देणे.
Google Drive प्रत्येक जीमेल अकाउंटला सर्व फोटो,पिडिएफ, ओडिओ, विडिओ फाईल मिडियाचे धरून १५ जीबी फ्री स्टोरेज देते. शिवाय सिक्युअरटी आहेच.
भाग पहिला ) सुरुवात -
प्रथम ब्राउजरमध्ये
drive.google.com/drive/my-drive
साइट ओपन करून आपल्याला हव्या असलेल्या जीमेल अकाउंटने साइन इन करायचे.
मोबाईलवरही साइट उघडा आणि डेस्कटॉप पेज ओप्शन करावे. App नको कारण पुढे शेअरिंग लिंक काढण्यास साइट बरी पडते.
भाग २ ) मिडिया फाईल अपलोड करून शेअरिंग लिंक मिळवणे.
+ new बटण वापरून मिडिया फाइल अपलोड करा. अपलोड झाल्यावर ती वर दिसेल. त्यामधल्या मेनूतून 'share' क्लिक करा.
शेअरिंग लिंकचे दोन पर्याय दिसतील त्यातील "anyone with this link can view" select करा.
जी लिंक येइल ती कॉपी करा. याला आपण मेन लिंक म्हणूया. ती साधारण
https://drive.google.com/file/d/xxxxxxxxxxxxxxxxxxx/view?usp=sharing
अशी दिसेल.
पण ही लिंक वेबसाइटवर चालत नाही. त्यात बदल करावा लागतो. मिडिया फाइलप्रमाणे खालील बदल करून ते वेबसाईटवर वापरता येतात.
अ) फोटो शेअरिंगचे Template
<img src="https://drive.google.com/uc?export=download&id=xxxxxxxxxxxxxxx" width="80%" /><br /><br />
मेन लिंकधला xxxxxxxxxxx ने दर्शवलेला आइडेंटिफायर कोड या टेम्प्लेटातल्या xxxxx ठिकाणी टाका.
मग सर्व कॉपी करून लेखात टाकले की फोटो लेखात उमटेल.
ब) ओडिओ mp3 file प्लेअरचेTemplate
<audio controls ><source src="https://drive.google.com/uc?export=download&id=xxxxxxxxxxx"></source></audio><br />
मेन लिंक मधला xxxxxxxxxxx हा आइडेंटिफायर कोड या टेम्प्लेटातल्या xxxxx ठिकाणी टाकून सर्व कॉपी करून लेखात टाकल्यास ओडिओ प्लेअर लेखात उमटेल.
क) विडिओ प्लेअरचे टेम्प्लेट
विडिओ प्लेअर टेम्प्लेट
<iframe frameborder="0" width="100%" src="https://drive.google.com/file/d/xxxxxxxxxxxxxxxxx/preview" ; allowfullscreen="true" > </iframe>
मेन लिंक मधला xxxxxxxxxx आइडेंटिफायर कोड या टेम्प्लेटातल्या xxxxxxxxx ठिकाणी टाकून लेखात टाकल्यास विडिओ प्लेअर उमटेल.
((
गूगल ड्राइव मिडिया शेअरिंग लिंक मिळवण्यासाठी इथे पाहा.
या साइटचा उपयोग होतो.
https://www.wonderplugin.com/online-tools/google-drive-direct-link-gene…))