मानसी - बॉलपेन स्केच

Manasi Sketch copy

बर्‍याच दिवसांनी आज स्केच करायला घेतले. मागच्या आठवड्यात दुपारी घरी सगळ्यांसोबतच्या करायच्या मनोरंजनात माझ्या लहान मुलीला साडी नेसवून फोटो काढले होते. त्यातलाच हा एक फोटो मी स्केचसाठी घेतला. साडीवरची कलाकुसर माझ्या भाचीची आहे.

पेन्सिलचं मला वावडं नाही पण ऐनवेळी बॉलपेनच येतो हातात. शिवाय, माझ्याकडे सगळा कार्यक्रम उत्स्फूर्त असतो. ठरवून असं काही होतच नाही. त्यामुळे बॉलपेन तर बॉलपेन. सांगा कसं झालंय. सर्वांच्या सूचना आणि अभिप्रायांचे स्वागतच आहे.