मिसळपाव साइटवर लेखनात audio file देणे.

मिपावर mp3 ओडिओ फाइल देणे.

ओडिओ फाईल्स या .wave / .wav / .mp3 / .aac / .ogg असू शकतात. पण काहीच वर्शन अपलोड होतात.
फाईल प्रथम कुठल्यातरी sharing साइटवर टाकून ( अपलोड करून) तिथून लिंक मिळवावी लागते. ती इथे द्यायची.
लिंक मिळवण्यासाठी तीन साईट्स ट्राई केल्या आहेत.

A )गूगल ड्राइव
गूगल ड्राइववर पूर्वी ओडिओ प्लेअरचा कोड मिळत असे. आता दिसत नाही. https://drive.google.com/drive/my-drive
हे उघडून sign in करणे जीमेल आइडीने.
- upload file
- share करणे. लिंक मिळेल.
ओडिओची लिंक >>>share+ >>> to people added किंवा to anyone पैकी दुसरा to anyone करणे >>> कॉपी करून साईटला देणे.
Google drive 1) secure , 2)15gb free storage आहे. . . . . पण लिंक मधून तुमचे नाव ओपन होते. एक वेगळा जीमेल आइडी अकाउंट यासाठी वापरता येईल.

B ) Clyp_ dot_ it ही साईट वापरून.
- https://clyp.it
- हे ओपन करणे,
- मोबाईलमधून करत असल्यास कदाचित डेस्कटॉप पेज उघडावे लागेल.
- upload
- save
- name, description भरून पुन्हा save केल्यावर
- खाली दोन लिंकस मिळतात. Direct आणि embed for player.
१) secure आहे, २) अकाऊंट करता येते, त्यात पाच सहा तासांचे रेकॉर्डिंग फ्री मिळते, ३) ओडिओ लिंक मिळते शेअरिंगची, ४) ओडिओ प्लेअर embed code ही मिळतो, ५) तुमची ओळख गुप्त राहते.

C ) Jumpshare site
- https://jumpshare.com उघडावी.
- अकाउंट करावे लागेल.
- ओडिओसह , फोटो, विडिओ, पिडिएफ अपलोड करून साठवता येतात. फ्री वर्शन 2GB.
- शेअरिंग लिंक काढून इथे देणे.

फेसबुकवर हे ओडिओ अपलोड सापडले नाही.
साइट्समध्ये सतत बदल केले जात असतात.
करून पाहा.
सूचना, सुधारणांचे स्वागत.