करवली

सहजंच फिरता फिरता आज पुन्हा तिथे आलो
आणि आठवली ती पहिलीच मंद झुळूक मोहरून टाकणारी
ते अवखळ चालणं
लटकेच हसणं
पापण्यांची उघडझाप
आणि लगबग पावले
त्यातली तारुण्याची नवाई
हसणारे ओठ
रुसणारे ओठ
आणि आत जाई-जुईच्या पाकळ्या
हसताना क्षणांत होतात मोकळ्या
पण पटकन लपतातही सगळ्या
नेसलेल्या साडीचा नवेपणा
डोळे कसले, शलाकाच त्या
आवाजाचे एक दोन शब्द
घर करून बसलेत कानभर
वाऱ्यावर झुलणारा भुरभूर कुन्तलभार
त्यातल्याच दोन तीन बटा चेहऱ्यावर रुळणार
आणि गालावरच्या खळीला स्पर्श त्या करणार
तो कर्दळीचा हात
त्यावर चंदनाची मेंदी
आणि वर पिवळं-धम्मक कंकण
इकडून तिकडे बागडणारी
करवली तू खरी
जिथे जाते तिथे
कारंज्यांच्या सरी
असतं एखादं पान असं
वाटतं पुन्हा पुन्हा उघडावं
बकुळीचं फुल जसं
सुगंध देत रहावं
आणि त्याचा सुगंध घेऊन
पुन्हा मिटून ठेवावं

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}