[कविता' २०२०] - जळू

जळू

माणसाच्या आयुष्यात
दोन 'जळू' सापडतात

एक... मनाला चिकटलेली
हि धोकादायक
सतत डसणारी, पीडा देणारी
मानसिक स्वास्थ्य खाणारी
हिला वेळीच चटका देणे उत्तम!

दुसरे ... काही क्षूद्र जीव
जे कारण असो किंवा नसो
तुमच्यावर सतत जळतील

दुर्लक्ष करा
जळतील जळतील
संपून जातील मेणबत्तीसारखे
तुम्ही चालत राहा!

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);

background-size: 4500px;
}