येवून जा जराशी..

येवून जा जराशी, भेटीची आस आता..
संगे तुझ्याच आहे, होतात भास आता..
तव स्मृतींचा पसारा, उरकून रात्र गेली,
ताजी पहाट मजला, वाटे भकास आता..
चिमणी उडून गेली टाकून त्या पिल्लांना,
माझ्या सवेच तेही, घरटे उदास आता..
दारातल्या कळीचे, जरी आज फुल झाले,
तरी त्यास नेहमीचा, नाही सुवास आता..
ढळणार ना कधीही, हा बांध भावनांचा,
आवरून मीही घेतो, माझ्या मनास आता..

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}