[कविता' २०२०] - आपलं माणूस

आपलं माणूस

प्रत्येकाला हवं असतं,
एक आपलं.. आपलं माणूस.
आर-पार ओळखणारं, समजून-उमजून घेणारं.

खरंतर आपण सांगितलेलं, त्याला काही समजत नाही.
त्यानं सागितलेलं काही, आपण कधी ऐकत नाही.
सगळ्या आपल्या वैतागाचं, ते हक्काचं कचराघर असतं.
अन् सगळं ओतून घेऊन पुन्हा, हसू घेऊन उभं असतं!

बोलण्यासाठी तिथं, शब्दांची गरज नसते.
खरखरीत हातामागचा ओथंबलेला स्पर्श..
मनातली द्वंद्व शांतवणारं नजरेमागचं मऊ हास्य..
पुरेसं असतं.. फक्त 'असणं'!

असं आपलं माणूस असणं फार फार भाग्याचं..
असं आपलं माणूस जपणं जगावरच्या मोलाचं..
त्याचं अस्तित्वच अतीव सुंदर..भगवंताच्या तोलाचं!

--
हृदयापासून उठणारी, हाक आपण ऐकणार का?
घेण्यासाठी हपापलेलं.. मन आपलं.. देणार का?

आपण सुद्धा कोणासठी, अपार प्रेमाची घागर बनायचं असतं.
आपण सुद्धा कोणासाठी, असं, 'आपलं माणूस' व्हायचं असतं.

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);

background-size: 4500px;
}